उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात प्रेमप्रकरणातून अपहरणाचा कट रचल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याची माहिती पोलिसांना मिळताच 14 दिवसांपासून पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची झोप उडाली होती. अपहरण प्रकरण असे होते की, किडनॅपरने अपहरण झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांपासून ते पोलीस खात्यातील उच्चपदस्थांपर्यंत सर्वांनाच टार्गेट केलं होतं आश्चर्याची बाब म्हणजे किडनॅपरने तरुणाची सुटका करण्याऐवजी एक लाखाची खंडणी मागितली होती.
15 मार्च रोजी प्रेम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बल्लमपूर येथे राहणारी एक वृद्ध महिला एसएसपी कार्यालयात आली आणि तिने आपल्या मुलाचे अपहरण झाल्याचं सांगितलं. किडनॅपर मोबाईलवर सतत मेसेज पाठवून एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत आहेत. खंडणीची रक्कम न दिल्याने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली जात आहे. महिलेने सांगितलं की, 2 मार्च रोजी तिचा मुलगा मातादीन काही कामानिमित्त घराबाहेर गेला होता.
7 मार्चपर्यंत मुलगा परतला नाही, त्यानंतर कुटुंबीयांनी मुलाच्या शोधात अनेक ठिकाणी फोन केले. पोलीस आणि कुटुंबीय दोघेही 24 वर्षीय मुलाचा शोध घेत होते. दरम्यान, किडनॅपरचे मेसेज कुटुंबीयांसह पोलिसांनाही येऊ लागले. 1 लाखांची खंडणी न दिल्यास मातादीनच्या हत्येचे मेसेज जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना येऊ लागले, त्यानंतर पोलीस विभागात अधिकच खळबळ उडाली. पोलिसांनी पकडलेल्या मातादीनची चौकशी सुरू करताच त्याने पोलिसांसमोर सर्व काही सांगितलं.
आरोपी मातादीनने सांगितले की, तो त्याच्या मामीवर खूप प्रेम करतो, यासाठी त्याने लग्नही केले नाही. मामी बरेच वर्ष अफेअर राहिल्यानंतर माझ्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न करू लागली. दोघांमध्ये यावरून वादही झाला. एके दिवशी मामीने धडा शिकवण्यासाठी पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली. याचा राग येऊन त्याने मामीला धडा शिकवण्याचा प्लॅन तयार केला आणि स्वतःच्या अपहरणाची गोष्ट रचली आणि घरातील सर्व सदस्यांना, नातेवाईकांना आणि पोलिसांना मेसेज पाठवायला सुरुवात केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"