उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कुशीनगरमधून एक प्रेमाची अजब कहाणी (Love Story) समोर आली आहे. भावोजी आणि मेहुणी असे काही प्रेमात पडले की, कशाचाही विचार न करता त्यांनी लग्न केलं. व्यक्तीच्या पत्नीने याला विरोध केला तर त्याने तिला घराबाहेर काढलं. एका मुलाची आई असलेली आई आता कोर्टात मदतीसाठी गेली. आता कोर्टाच्या आदेशावरून पाच लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण हे प्रकरण जरा किचकट आहे.
बिहारच्या गोपालगंज कल्याणपूर येथील तरूणीचं लग्न कुशीनगर जनपदच्या एका तरूणासोबत झालं होतं. असं सांगितलं जात आहे की, मेहुणी भावोजीच्या प्रेमात पडली आणि दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, पिंटू राजभरचं लग्न २०१९ मध्ये बिहारच्या गोपालगंजमधील एका तरूणीसोबत झालं होतं. दोघांना एक मुलगाही आहे. लग्नानंतर पिंटू नेहमीच सासरी येत होता. यादरम्यान त्याच्यात आणि मेहुणीत प्रेमसंबंध निर्माण झाले.
पिंटूची पत्नी हे भावोजी आणि मेहुणीतील गमतीचं नातं म्हणून दुर्लक्ष करत राहिली. दुसरीकडे पिंटू आणि मेहुणीचं प्रेम अजून वाढत गेलं. नंतर पिंटूने मेहुणीसोबत लग्न केलं. बहीणच सवत झाल्याने पिंटूची पत्नी संतापली आणि तिने याचा विरोध केला. मग पिंटूने कशाचीही पर्वा न करता तिला घरातून काढलं.
पिंटूच्या पहिल्या पत्नीचा आरोप आहे की, बहिणीसोबत लग्न केल्यानंतर पती पिंटूने तिला मारहाण केली. त्यानंतर एक दिवस तिला घरातून काढण्यात आलं. काहीच मदत न मिळाल्याने महिला कोर्टासमोर न्यायासाठी गेली. कोर्टाच्या आदेशावरून पिंटूसहीत ५ लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता चौकशी केली जात आहे.
नव्या नवरीचा कारनामा
कौशांबी जनपदच्या एका नव्या नवरीने असा काही कारनामा केला की, वाचून सगळेच हैराण झाले. नवरी पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करत होती. मग जेव्हा पतीने पत्नीसोबत पुन्हा संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तर महिलेने पतीच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतला. यानंतर पीडित पती बेडवर ओरडत राहिला. त्यानंतर नवरी पैसे आणि दागिने घेऊन फरार झाली. पोलीस या नवरीचा शोध घेत आहेत.