मोबाईल चोरीच्या संशयावरुन एकाला कपडे काढून पेटत्या दांडक्यानं केली मारहाण, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 03:00 PM2022-02-08T15:00:20+5:302022-02-08T15:00:59+5:30

Assaulting Case : पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. ही घटना लाडपुरा गावातील असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Man beaten with burning stick on suspicion of mobile theft, video goes viral | मोबाईल चोरीच्या संशयावरुन एकाला कपडे काढून पेटत्या दांडक्यानं केली मारहाण, व्हिडीओ व्हायरल

मोबाईल चोरीच्या संशयावरुन एकाला कपडे काढून पेटत्या दांडक्यानं केली मारहाण, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

माणुसकीला लाजवेल अशी घटना मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातून समोर आली आहे. मोबाईल चोरल्याच्या संशयावरून दोन लोकांनी एका दलित व्यक्तीचे कपडे काढले आणि त्याला बेदम मारहाण केली. त्याची क्रूरता इथेच थांबली नाही. नंतर जाडजूड लाकडी काठीला जाळून त्याने त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली.

पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. ही घटना लाडपुरा गावातील असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन लोक एका व्यक्तीला कसे बेदम मारहाण करत आहेत, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचवेळी काही लोक बघ्यांची भूमिकेत उभे राहून मारहाण बघत आहेत.

विजयनगर पोलिस स्टेशनचे प्रभारी राकेश कुमार गुप्ता यांनी सांगितले की, पीडितेने नंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. ज्यात त्याने सांगितले की, दोन लोकांनी त्याच्यावर मोबाईल चोरीचा आरोप करत त्याचे कपडे काढले. त्यानंतर जाडजूड काठी पेटवून त्याला बेदम मारहाण केली.

याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली ३२३ , ३२४ , २९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हेतराम गुर्जर आणि गोलू मुस्लिम अशी आरोपींची नावे आहेत, असे त्यांनी सांगितले.

१०० रूपयांच्या वादात मित्राची हत्या करत केला आत्महत्येचा बनाव

मेहुणीशी लग्न करण्यासाठी सुपारी देऊन पतीने पत्नीची केली हत्या, नराधमाने मृतदेहावर बलात्कार

तासाभरात अटक
पोलिस स्टेशन प्रभारी राकेश कुमार गुप्ता यांनी सांगितले की, गुन्हा दाखल होताच हेतरामला पोलिसांनी तासाभरात अटक केली आहे. तर गोलू अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. यासह पीडित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल येताच आरोपींवर इतर कलमांखालीही गुन्हा दाखल होऊ शकतो.

Web Title: Man beaten with burning stick on suspicion of mobile theft, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.