'DNA टेस्टसाठी पत्नीने दिला नकार', व्हिडीओ शेअर करून तरूणाने ट्रेनखाली केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 11:30 AM2022-07-16T11:30:51+5:302022-07-16T11:31:35+5:30
Madhya Pradesh : तरूणाला संशय होता की, त्याच्या पत्नीचं दुसऱ्या एका तरूणासोबत अफेअर सुरू आहे. तरूणाचा हा आत्महत्येआधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदुरमधून (Indore) आत्महत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरूणाने ट्रेनखाली येऊन आपलं जीवन संपवलं. रेल्वे पोलिसांनी घटनेची नोंद करून मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला आहे. असं सांगितलं जात आहे की, आत्महत्या करण्याआधी त्याने एक व्हिडीओ बनवला होता.
या व्हिडीओत तरूणाने पत्नीला त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं आहे. तरूणाला संशय होता की, त्याच्या पत्नीचं दुसऱ्या एका तरूणासोबत अफेअर सुरू आहे. तरूणाचा हा आत्महत्येआधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना इंदुरच्या जीआरपी पोलीस स्टेशन भागातील आहे. इंदुरच्या राजेश पटेलने ट्रेनखाली उडी घेऊन आत्महत्या केली. तरूणाने आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड केला होता. या व्हिडीओत त्याने पत्नीने त्याला त्रास दिल्याचं सांगितलं. तसेच त्याने पत्नीवर अनेक गंभीर आरोपही लावले.
काय म्हणाला तरूण
मृत तरूणाने व्हिडीओत सांगितलं की, त्याला संशय आहे की, त्याची मुलं त्याची नाहीत. जेव्हा त्याने पत्नीला डीएनए टेस्ट करण्यास सांगितलं तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला. यामुळे तो चिंतेत होता. व्हिडीओत तो म्हणाला की, आता वेळी अशी आली आहे की, मरण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यामुळे तो आत्महत्या करत आहे.
एएसपी राकेश खाका म्हणाले की, ही घटना 13 जुलैची आहे. राजेश पटेल नावाच्या तरूणाच्या आत्महत्येची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवला. सध्या पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहिली जात आहे. मृतकाच्या परिवाराची चौकशी केली जात आहे.