गुजरातच्या भूजमध्ये गुरूवारी कोर्टाने १९ वर्षीय एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तिघांपैकी एका दोषीला संशय होता की, मृत व्यक्तीचे त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत. ज्यानंतर दोषीने आपल्या २ साथीदारांसोबत मिळून पीडित व्यक्तीची कुऱ्हाडीने तुकडे करून हत्या केली.
टाइम्स ऑफ इंडियात प्रकाशित वृत्तानुसार, देवांग बिझनेसच्या कामासाठी मांडवीच्या नाना भालिया गावातील दोषी रामच्या घरी अनेकदा जात-येत होता. नंतर काही दिवसांनी रामला संशय आला की, देवांग आणि त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध आहे. यानंतर दोषी खेमराज आणि नारानने देवांगला रामच्या पत्नीला न भेटण्याची धमकीही दिली. पण देवांगने काही ऐकलं नाही. त्यानंतर रामने त्याच्या साथीदारांसोबत मिळून देवांगची हत्या करण्याचा निर्णय घेतला. (हे पण वाचा : मुलीला बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, संतापलेल्या सावत्र पित्याने असे काही केले)
तिन्ही दोषींनी देवांगला मारण्याचा प्लॅन केला. त्यांच्या प्लॅननुसार, १२ फेब्रुवारी २०१८ ला देवांगला शेतात भेटण्यासाठी बोलवलं. त्यानंतर देवांग आपल्या आई-वडिलांना सांगून बाहेर पडला. तो म्हणाला की, काही कामानिमित्त बाहेर जात आहे. तो उद्या सकाळी परत येईल.
काय झालं त्या दिवशी?
जेव्हा देवांग शेतात पोहोचला तेव्हा राम त्याला तलावाकडे घेऊन गेला. तिथे खेमराज आणि नारान त्याची वाट बघत होते. तिथे पोहोचल्यावर रामने देवांगला जमिनीववर पाडले आणि तिघांनी त्याला दोराने बांधले. त्यानंतर तिघांनी देवांगला निर्दयीपणे जीवे मारले. त्यानंतर तिघांनी त्याचा मृतदेह फेकण्याचा प्रयत्न केला. (हे पण वाचा : खळबळजनक! अपहरण करत त्याने तरुणीची डोक्यात दगड घालून केली निर्घृण हत्या)
दोषींनी देवांगचा मृतदेह बोअरवेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. पण बोअरवेलचं तोंड लहान असल्याने त्यात तो त्याला टाकता येऊ शकत नव्हतं. त्यानंतर ते शेजारच्या शेतातून कुर्हाड घेऊन आले आणि देवांगचे पाच तुकडे केले. त्यानंतर हे तुकडे ४०० फूट खोल बोअरवेलमध्ये टाकले.
जेव्हा दुसऱ्या दिवशी १३ फेब्रुवारी २०१८ ला देवांग आपल्या घरी परतला नाही तर त्याच्या वडिलांनी गांडवीमध्ये मुलगा बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार दिली. नंतर पोलिसांनी कॉल रेकॉर्ड्सच्या आधारावर राम, खेमराज आणि नारन यांना अटक केली. चौकशी दरम्यान त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. तसेच मृतदेह कुठे लपवला हेही सांगितले. ४०० फूट खोल बोअरवेलमधून देवांगचा मृतदेह काढण्यासाठी ६ दिवस लागले होते.