प्रमोशन मिळवण्यासाठी खालच्या थराला गेला पती, पत्नीवर बॉससोबत संबंध ठेवण्याचा टाकत होता दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 03:59 PM2023-03-08T15:59:49+5:302023-03-08T16:01:47+5:30
महिलेने आरोप केला की, लग्नापासून तो चुकीच्या मार्गाला लागला होता आणि तेव्हापासूनच या कृत्यासाठी तो तिच्यावर दबाव टाकत होता. तिने सांगितलं की, अमितला प्रमोशन हवं होतं.
पती-पत्नीचं नातं हे गाडीच्या दोन चाकांसारखं असतं. दोन्ही चाकं एकमेकांना समजून घेऊन सुरळीत चालत असतात. कोणत्याही पतीसाठी त्याची पत्नी त्याचा अभिमान आणि सन्मान असते. अशात कुणीही आपला सन्मान मातीत टाकणार नाही. पण पुण्यातील एका व्यक्तीने फारच वाईट काम केलं. त्याने पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासली आहे.
टाइम्स नाऊ न्यूजच्या रिपोर्टनुसार, मध्य प्रदेशच्या इंदुरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. ज्याबाबत वाचून तुम्हाला राग अनावर होईल. महिलेने आरोप केला की, पुणे शहरात राहणारा तिचा पती कथितपणे बॉससोबत झोपण्यासाठी तिच्यावर दबाव टाकतो. अमिता छाबडा नावाच्या व्यक्तीवर आरोप लावत महिला म्हणाली की, पतीला प्रमोशनची इतकी लालसा होती की, तो तिला त्याच्या बॉसला खूश करण्यासाठी त्याच्याजवळ पाठवणार होता.
महिलेने आरोप केला की, लग्नापासून तो चुकीच्या मार्गाला लागला होता आणि तेव्हापासूनच या कृत्यासाठी तो तिच्यावर दबाव टाकत होता. तिने सांगितलं की, अमितला प्रमोशन हवं होतं, त्यासाठी तो असं करत होता. महिलेने आपल्या पतीसोबतच दीरावरही गंभीर आरोप केले. ती म्हणाली की, दीरही तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतो. इतकंच नाही तर 12 वर्षाच्या मुलीसमोर तो तिच्यासोबत अश्लील चाळे करत होता. विरोध केला तर तिला मारहाण केली जात होती.
महिलेने कथितपणे हाताची नस कापून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. ऑगस्ट 2022 मध्ये या गोष्टींना वैतागून ती आपल्या आई-वडिलांच्या घरी परत आली होती. तिने घरच्यांना या अत्याचारांबाबत काहीच सांगितलं नव्हतं. नंतर सांगितलं तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी नंतर अमितला बोलवलं आणि त्याला पत्नीला न देण्याबाबत समजावून सांगितलं. त्याने लिहून दिलं की, तो पत्नीला त्रास देणार नाही. पण काही दिवसांनी सासरचे लोक पुन्हा तिला त्रास देऊ लागले होते. तेव्हा महिलेच्या आई-वडिलांनी इंदुर कोर्टात अर्ज दाखल केला. चौकशीनंतर पती, सासू आणि दीरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.