वेश्याव्यवसाय प्रकरणी कोलव्यात मध्यप्रदेशातील एकजण जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 20:28 IST2020-07-31T20:26:15+5:302020-07-31T20:28:55+5:30
दोन युवतींची सुटका

वेश्याव्यवसाय प्रकरणी कोलव्यात मध्यप्रदेशातील एकजण जेरबंद
मडगाव - गोव्यातील कोलवा पोलिसांनी आज शुक्रवारी वेश्याव्यवसाय प्रकरणाचा पर्दाफाश करताना मूळ मध्यप्रदेश राज्यातील विजय सिंग (३७) या इसमाला जेरबंद केले. तर दोन युवतींची सुटका केलीत्यातील एक महाराष्ट्रातील असून, दुसरी कोलकोत्ता येथील आहे.
संशयित सिंग हा सदया तो फातोर्डा येथे रहात होता. गेली पंधरा वर्षांपासून गोव्यात तो वास्तव करुन होता. आज दुपारी तो कोलवा येथील पार्किग जागेवर दोन युवतीसमवेत येणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मेलिटो फर्नांडीस, पोलीस शिपाई विकास कौशिक व रोहन नाईक व अन्य पोलिसांनी सापळा रचून संशयित दुचाकीवर आला असता, त्याला ताब्यात घेउन नंतर रितसर अटक केली. वेश्या व्यवसाय प्रतिबंधात्मक कायदयाखाली संशयितावर गुन्हा नोंद केला असून, पुढील पोलीस तपास चालू आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी
मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल
तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्...