लखनऊ- मडियाव येथे राहणारी इशरत परवीननं प्रेमासाठी धर्म बदलला अन् आयुष्यभर साथ निभावण्याचं वचन देत सोनी तिवारी बनली. परंतु तिला थोडीही भनक नव्हती ज्या पुष्पेंद्र तिवारीवर तिने जिवापाड प्रेम केले तोच एकदिवस तिच्या मृत्यूचं कारण बनेल. पुष्पेंद्रनं २ साथीदारांच्या सहाय्याने सोनीचा काटा काढला. त्यानंतर स्वत:ला वाचवण्यासाठी त्याने फिल्मीस्टाइल बनाव रचला मात्र पोलिसांच्या हुशारीनं तो त्यानेच बनवलेल्या जाळ्यात अडकला.
पोलिसांनी या प्रकरणी ३ आरोपींना अटक करत जेलमध्ये पाठवलं आहे. माहितीनुसार, मसकनवा येथील पुष्पेंद्र तिवारी उर्फ शुभम २०१९ मध्ये जीम ट्रेनर म्हणून काम करत होता. ज्याठिकाणी इशरत परवीन नेहमी यायची. प्रशिक्षणावेळी दोघांमध्ये ओळख झाली त्याचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. काही दिवसांनी पुष्पेंद्र मॉडेल बनण्यासाठी मुंबईला आला. त्याच्यानंतर इशरतही मुंबईत पोहचली. धर्म बदलून इशरतनं पुष्पेंद्रसोबत लग्न केले. लग्नाच्या ६ महिन्यानंतर कोरोना लाट आली त्यानंतर ते लखनऊला परतले.
जीम बंद झाल्यामुळे पुष्पेंद्र बेरोजगार झाला होता. त्याचसोबत मडियाव येथे दोघं भाड्याच्या खोलीत राहत होते. रोजगाराच्या शोधात असलेल्या पुष्पेंद्रनं काही मित्रांच्या मदतीने मसकनवा गावात जीम उघडली. तो लखनऊलाही येऊन जात करत होता. त्यावरून इशरत उर्फ सोनी तिवारी आणि पुष्पेंद्रमध्ये वाद होऊ लागले. नातेवाईकांनी दोघांना वेगवेगळे राहण्याचा सल्ला दिला. परंतु पुष्पेंद्रनं नकार दिला. तेव्हा सोनीचे दुसऱ्या युवकासोबत संबंध असल्याचा संशय पुष्पेंद्रला आला.
त्यानंतर पुष्पेंद्रनं सोनीची हत्या करण्याचा डाव रचला. त्यात भाऊ गोविंदने साथ दिली. सुरुवातीला तो तयार नव्हता परंतु पुष्पेंद्रने दृश्यम सिनेमा दाखवून त्याला तयार केला. पुष्पेंद्र आणि गोविंदचं व्हॉट्सअप चॅट पोलिसांच्या हाती लागलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येत सहभागी असणाऱ्या ३ आरोपींची वेगवेगळी चौकशी करण्यात आली. तेव्हा सूरज वर्माने मैत्रीसाठी पुष्पेंद्रला साथ दिली असं कबूल केले. पुष्पेंद्रच्या कार दुरुस्तीसाठी सूरजने त्याचा बाईक गहाण ठेवून १५ हजार रुपये जमवले.
२ सप्टेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास आदिलनगर येथील भाड्याच्या घरात ही घटना घडल्याची कबुली आरोपींनी दिली. संध्याकाळच्या सुमारास सूरजने गोविंदला त्याच्या स्कूटीवरून नेले आणि एका मित्राच्या घरी थांबवले. प्लॅननुसार पुष्पेंद्रने दरवाजा उघडून दोघांनाही खोलीत प्रवेश दिला. यानंतर गोविंदने सोनीचा पाय धरला आणि सूरजने तिचा हात पकडला. सोनीला काही समजण्यापूर्वीच पुष्पेंद्रने तिचा चेहरा टॉवेलने दाबून खून केला. बसलेल्या मुद्रेत मृतदेह जमिनीवर ठेवून वरून सॅक बांधून गाडीच्या मागच्या सीटवर मृतदेह ठेवला. यानंतर सूरज स्कूटीवरून निघून गेला आणि दोन्ही भाऊ गाडीतून बाहेर पडले. बहराइचजवळील घाघरा नदीत मृतदेह टाकून परत आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिलनगरमध्ये पुष्पेंद्रच्या घराजवळ हॉस्पिटल आहे. त्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तिघेही पोतं आणून गाडीत ठेवताना स्पष्ट दिसत आहेत. यानंतर तिघंसोबत जातानाची छायाचित्रे टेधी पुलिया आणि मुन्शी पुलिया यांच्या कॅमेऱ्यात कैद झाली. फुटेजनुसार, गोविंद पुढच्या सीटवर बसला होता आणि पुष्पेंद्र गाडी चालवत होता. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर प्लासिओ मॉलमध्ये पोहोचले आणि स्वत:ला वाचवण्याच्या उद्देशाने ते सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. यानंतर सोनीचा मोबाईल झुडपात फेकून दिला. दरम्यान, दिल्लीत राहणाऱ्या सोनीच्या एका मित्राने फोन केला. तिने फोन न उचलल्याने पुष्पेंद्रशी संपर्क साधला असता, सोनी प्रियकरासह पळून गेल्याचे त्याने सांगितले. आरोपींनी पोलीस तपासात गुन्हा कबूल केला.