केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक महिला गेल्या १५ महिन्यांपासून अचानक बेपत्ता झाली होती. या प्रकरणी तिच्या पतिनेच पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी पत्नीचा शोध सुरू केला पण, यात पोलिसांना कोणतीच माहिती मिळाली नाही. पोलिसांना पहिल्यापासूनच पतीवर संशय होता, पण यात पोलिसांना पुरावा सापडत नव्हता. पोलीस फक्त पतीच्या एका चूक शोधत होते. अखेर पोलिसांना या प्रकरणाचा एक पुरावा मिळाला, अखेर १८ महिन्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.
ही घटना केरळमधील नजरक्कल पोलीस ठाणे परिसरातील आहे. या परिसरात संजीव आणि राम्या नावाच दाम्पत्य राहत होते. गेल्या अनेक वर्षापासून ते या ठिकाणी राहत होते. अचानक २०२१मध्ये पत्नी गायब झाली. या प्रकरणाची पतीने पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांनीही पत्नीचा शोध घेतला, पण तिचा कुठेही पत्ता लागला नाही.
पोलिसांचा पती संजीववर आधीच संशय होता. चौकशीत त्याला कोणताही प्रश्न विचारला असता तो पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करत होता. एकाही प्रश्नाला त्याने बरोबर उत्तर दिले नाही. तपासातही तो पोलिसांची दिशाभूल करत राहिला. मात्र, पोलीस पथकाने त्याच्यावर दीड वर्ष नजर ठेवली आणि त्याच्यावर खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे गोळा केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पती संजीव याच्याशी फोनवरून झालेल्या वादातून पत्नी रम्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर पती संजीवने मृतदेह घराजवळ पुरले. आपली पत्नी दुसऱ्या कोणासोबत पळून गेल्याचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांना सांगून आरोपी पुढील लग्नाच्या तयारीत होता.
पोलिसांनी केलेल्या तपासात घरामध्ये खोदकाम सुरू असताना महिलेच्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले. या आणि इतर पुराव्यांच्या आधारे संजीवला खून आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.