देहूरोड : येथील बाजारपेठेतील एका प्रख्यात व्यापाºयाचे राहत्या घराजवळून सोमवारी सकाळी सातच्या सुमारास अपहरण करण्यात आल्याची घटना घडली होती. या संदर्भात पोलिसांनी माग काढून संबंधित व्यापाºयाची सुटका करीत एकास ताब्यात घेतले आहे. मारहाण झाल्याने संबंधित व्यापाºयाला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.सत्यनारायण आगरवाल (रा. मेन बाजार, देहूरोड, पुणे) यांनी फिर्याद दिली होती. ईश्वर किसनलाल आगरवाल (वय ५२, रा. मेन बाजार, देहूरोड, पुणे) असे अपहृत व्यापाºयाचे नाव आहे. ते सामाजिक कार्यकर्ते असून, देहूरोड येथील श्री नारायणदेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.आगरवाल त्यांच्या घराजवळच सकाळी सातच्या सुमारास देवपूजा करण्यासाठी मंदिरात चालले असताना एका मोटारीतून आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण केले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला होता. अपहरण करणाºयांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या मागावर तपासासाठी पथक रवाना करण्यात आले होते.दरम्यान, एक पोलीस पथक बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेजवरून तपास करीत होते. अपहरण करणाºयांचा माग काढून त्यातील एकास सोमवारी सांयकाळी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
व्यापाऱ्याच्या अपहरणप्रकरणी एकाला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 1:21 AM