एकच बँक सलग दोन दिवस लुटण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अमेरिकेत एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 33 वर्षीय सॅम्युअल ब्राउन हा कॅलिफोर्नियाच्या फाऊंटन व्हॅलीमध्ये त्याच बँक शाखेत आपल्या पहिला दरोडा यशस्वी झाल्यानंतर 24 तासांच्या आत दुसरा दरोडा टाकण्यासाठी गेला. मात्र, दुसऱ्या दरोड्याच्या वेळीच पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी न्यूहोप स्ट्रीट चेजमध्ये एका कॅशियरला घाबरवल्यानंतर आरोपी सॅम्युअल ब्राउन मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन फरार झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपी सॅम्युअल ब्राउन पुन्हा बँकेत गेला आणि त्याने बँक लुटण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रात्री 11:15 च्या सुमारास पोलीस बँकेच्या शाखेत पोहोचले आणि दरोड्याच्या आरोपींना अटक केली. ब्राऊनला यापूर्वी सॅन दिएगोमध्ये दरोड्यात दोषी ठरवण्यात आले होते आणि तपास यंत्रणेकडे त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट होते.
याचबरोबर, पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, त्याला ऑरेंज काउंटी जेलमध्ये 1,70,000 डॉलरच्या जामिनावर ठेवले आहे. जर त्याने किंवा त्याच्या कुटुंबाने या दंडाची रक्कम भरली तर त्याला जामीन मिळू शकतो.