भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याप्रकरणीचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेत एनआयएकडे (NIA) सोपविलेला असताना आता आणखी एक मोठा धक्का केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे. आता स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन प्रकरणाचा (Mansukh Hiren Case) तपासही एनआयए करणार आहे. (Mansukh Hiren death case taken over by NIA. Formal order from MHA issued to NIA regarding this. This case was earlier being investigated by Maharashtra ATS: Official Sources)
स्फोटक प्रकरणाचा तपास याआधी मुंबई पोलीस दलाच्या सीआययूचे प्रमुख आणि एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) करत होते. मात्र वाझे यांची भूमिका संशयास्पद आढळून आल्याने हा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला. यानंतर एनआयएने वाझेंनाचा अटक करताच त्यांनीच स्फोटकांची कार ठेवल्याचे तपासात समोर आले. वाझेंना २५ मार्चपर्यंतची कोठडी सुनावण्यात आली आहे.
सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांचा परस्पर संबंध आल्याने एनआयएने हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही आपल्याकडेच देण्यात यावा अशी मागणी गृहमंत्रालयाकडे केली होती. महाराष्ट्र एटीएस याचा तपास करत होते. यासाठी आवश्यक परवानग्या गृह मंत्रालयाकडून एनआयएने मागितल्या होत्या. या परवानग्या एनआयएला गृहमंत्रालयाने आज दिल्या आहेत. यानुसार आजपासून एनआयएच मनसुख हिरेन प्रकरणात तपास करणार आहे. एनआयएला खुनाची केस थेट हाती घेण्याचा अधिकार नाही. पण मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा संबंध अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारशी आहे. अंबानींच्या घराबाहेर आढळलेली कार हिरेन यांच्याच मालकीची होती. त्यामुळेच हिरेन यांच्या मृत्यूचा तपास करण्याची विनंती करण्यात आली होती.
मनसुख हिरेन यांचा मृत्यू नेमका कशामुळे?मनसुख हिरेन पाणी पडले त्यावेळी काही वेळ ते जिवंत होते. त्यांच्या फुफ्फुसात खाडीचं पाणी गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डायटम बोन अहवालातून समोर आली आहे. त्याआधी हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी एक अहवाल काही दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यात मनसुख यांनी स्वत:ला वाचवण्याचा थोडा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या फुफ्फुसात जास्त पाणी आढळून आलेलं नाही, अशी माहिती शवविच्छेदन अहवालातून पुढे आली होती.