मुंबई – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली त्यानंतर या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला होता, या संपूर्ण प्रकरणानं राज्याच्या वातावरण ढवळून निघालं आहे, मुख्यत: या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे याला NIA ने अटक केल्यानंतर तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलं. सचिन वाझे याची चौकशी करताना NIA ने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.(Sachin Vaze present at meeting where Mansukh Hiren's murder was planned: NIA tells court)
मंगळवारी NIA ने कोर्टात म्हटलं की, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि पोलीस कर्मचारी विनायक शिंदे हे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचं षडयंत्र रचण्यात सहभागी होते, कट रचणाऱ्यांसोबत सचिन वाझे मोबाईलवरून संपर्कात होते. हे षडयंत्र कोणी रचलं आणि हत्येमागे काय हेतू होता इथपर्यंत NIA चा तपास पोहचला आहे असं त्यांनी सांगितलं. NIA कोर्टाने विनायक शिंदे आणि नरेश गोर याला ७ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.
ठाण्यातील मनसुख हिरेन यांची स्कोर्पिओ गाडी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारी रोजी आढळली होती(Mukesh Ambani Bomb Scare), या गाडीत स्फोटकांनी भरलेल्या जिलेटिनच्या कांड्या सापडल्याने मोठी खळबळ उडाली. यानंतर ५ मार्च रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला. यात महाराष्ट्र एटीएसनं निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना अलीकडेच अटक केली होती.
एनआयएच्या माहितीप्रमाणे, तपास पथकाला १४ मोबाईल क्रमांक सापडले त्यातील ५ मोबाईल नंबर सचिन वाझेंना देण्यात आले होते. यातील एका मोबाईल नंबरवरून सचिन वाझे मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी वापरत होता. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा उलगडा होण्यापर्यंत NIA चा तपास पोहचला आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास महाराष्ट्र एटीएस(Maharashtra ATS) करत होती, परंतु त्यानंतर हा तपास NIA कडे वर्ग करण्यात आला. NIA मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्हीचा तपास करत आहे, NIA ने कोर्टात हे दोन्ही प्रकरण एकमेकांनी जोडले आहेत असं सांगितलं आहे. सचिन वाझेला ३ एप्रिलपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे.