लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाºयाला मारहाण केल्याप्रकरणी अपक्ष आमदार व राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने गुरुवारी मंजूर केला.
सरकारी अधिकाºयाशी अर्वाच्य भाषेत बोलल्याने व त्याला मारहाण केल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने वारंवार समन्स बजावूनही बच्चू कडू न्यायालयात हजर राहिले नाहीत. अखेरीस न्यायालयाने कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्यामुळे कडू १४ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहिले आणि जामिनासाठी अर्ज केला. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे जामिनासाठी कडू यांनी तातडीने विशेष न्यायालयात धाव घेतली.
त्यांच्या जामिनावर उत्तर देताना सरकारी वकिलांनी कडू यांना जामीन अटी घालण्यात याव्यात, अशी विनंती न्यायालयाला केली. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यावर विशेष खासदार, आमदार न्यायालायचे न्या. राहुल रोकडे यांनी बच्चू कडू यांचा जामीन अर्ज मंजूर केला. स्पर्धा परीक्षांची वेबसाईटचा वारंवार गैरवापर होत असल्याने कडू २०१८ मध्ये काही विद्यार्थ्यांसह मंत्रालयात निषेध करण्यासाठी गेले होते.