शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

हार्डडिस्क डेटा तपासणीनंतर उलगडणार अनेक रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 8:08 PM

आयकरची धाड : बँक लॉकरमधून आणखी अडीच किलोचे सोने जप्त

ठळक मुद्देयकर अधिकाऱ्यांनी १६ जानेवारी रोजीच्या धाडसत्रात जप्त केलेल्या हार्डडिस्कच्या तपासणीनंतर बिल्डर, उद्योगपती व व्यापाऱ्यांनी लपवून ठेवलेल्या माहितीचे अनेक रहस्य उलगडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बिल्डर, व्यापारी व उद्योगपतींनी शासनाचा किती कर बुडविला, याची माहिती उघड झाल्यानंतर आयकर विभागाची पुढील कारवाईची दिशा ठरणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

अमरावती - आयकर विभागाच्या अधिकाºयांनी गुरुवारी सील केलेले बँक लॉकर उघडून आणखी अडीच किलोचे सोने जप्त केल्याची माहिती पुढे आली आहे. आयकर अधिकाऱ्यांनी १६ जानेवारी रोजीच्या धाडसत्रात जप्त केलेल्या हार्डडिस्कच्या तपासणीनंतर बिल्डर, उद्योगपती व व्यापाऱ्यांनी लपवून ठेवलेल्या माहितीचे अनेक रहस्य उलगडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आयकर अधिकाºयांच्या २७ पथकाने एकाचवेळी शहरातील बिल्डर प्रवीण मालू, शंकरलाल बत्रा, पनपालीया बंधू, कैलास गिरुळकर, तलडा बंधू, अशोक सोनी यांचे घर, कार्यालये व व्यापारी प्रतिष्ठानांवर धाडसत्र राबविले. या धाडीत अडीच कोटींची रोख जप्त करून बँक लॉकरमधून दोन किलोचे सोन्याचे दागिने जप्त केले. याशिवाय आयकर अधिकाºयांनी बिल्डर, व्यापारी व उद्योगपतींच्या घर, कार्यालय व प्रतिष्ठानांतून संगणकांची हार्डडिस्क, मोबाईल डेटा व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले. गुरुवारी सकाळी नागपूर येथून आयकरचे अधिकारी अमरावतीत दाखल झाले. त्यांनी सेंट्रल बँक आॅफ इंडिया येथील सील केलेल्या लॉकरची झडती घेऊन अडीच किलो सोन्याचे दागिने जप्त केले. ते दागिने घेऊन अधिकारी नागपूर रवाना झाले. आता आयकर अधिकारी बिल्डर, व्यापारी व उद्योगपतींकडून जप्त केलेल्या दस्तऐवज व हार्डडिस्कची तपासणी करीत आहेत. दस्ताऐवज, मोबाईल डेटा व हार्डडिस्कमध्ये बिल्डर, व्यापारी व उद्योगपती यांच्या आर्थिक व्यवहारांची इत्थंभूत माहितीच्या आधारे त्यांनी कोणाकोणाशी रोखीचे व इतर व्यवहार केले, त्यामध्ये किती आयकर बुडविला, याचे विश्लेषण केले जाईल. बिल्डर, व्यापारी व उद्योगपतींनी शासनाचा किती कर बुडविला, याची माहिती उघड झाल्यानंतर आयकर विभागाची पुढील कारवाईची दिशा ठरणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सraidधाडMobileमोबाइलGoldसोनं