नवी मुंबई - मराठा आरक्षणावरुन मुंबईत पुकारलेल्या बंदवेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला. या हिंसाचारानंतर पोलिसांकडून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. नवी मुंबईतही हत्या आणि जाळपोळीसारख्या हिंसा पसरवणाऱ्या घटना आंदोलनावेळी घडल्या आहेत. याप्रकरणी फरार असलेल्या तिघांना गोव्यातील कलंगुट पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील हिंसाचारप्रकरणी या तिघांना अटक केल्याचे कलिंगवूडचे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मुंबई बंदवेळी नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार पसरला होता. तसेच गाड्यांची तोडफोड - जाळपोळ करण्यात आली होती. जमावाने केलेल्या तुफान दगडफेकीनंतर पोलीसंच कर्फ्यू देखील लावण्यात आला होता. अनेक तरुणांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मारहाणीत जखमी झालेला तरुण रोहन तोडकर (वय - १९) याचा मृत्यू देखील झाला होता. दरम्यान, इंटरनेट सुविधा बंद करण्याचा अत्यंत चांगला निर्णय घेतल्यामुळे परस्थिती नियंणत्रात आली. याप्रकरणी गोव्यात कलंगुट पोलिसांनी भूषण भगवान आगास्कर, आशिष काळे आणि चंद्रशेखर या तिघांना अटक केली आहे.