शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अभिनेत्री भाग्यश्री मोटेची उच्च न्यायालयात धाव, बहिणीच्या मृत्यृ प्रकरणाचा तपास CBI कडे सोपविण्याची मागणी

By नारायण बडगुजर | Published: September 23, 2023 9:36 PM

वाकड येथे १२ मार्च २०२३ रोजी संशयास्पदरित्या झाला होता मृत्यू

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिची मोठी बहीण मधू मार्कंडेय हिचा वाकड येथे १२ मार्च २०२३ रोजी संशयास्पदरीत्या मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांकडून योग्य तपास झाला नसल्याचा दावा भाग्यश्री करीत आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा म्हणून भाग्यश्रीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

मधु यांच्या मृत्यूच्या तीन आठवड्यांपूर्वीच त्यांचे पती संकेत मार्कंडेय यांचे निधन झाले होते. मधु या केक बनविण्याचा वर्कशॉप घेणार होत्या. त्याकरिता त्यांची एका महिलेशी ओळख झाली होती. या महिलेच्या म्हणण्यानुसार केक वर्कशॉपसाठी त्यांना एक खोली आवश्यक होती. तेव्हा ती खोली पाहण्यासाठी घटनास्थळी मधू आणि संबंधित महिला गेली होती. त्यावेळी मधु चक्कर येऊन कोसळल्या. मधु यांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते. 

वाकड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. घटनास्थळी मिळालेला मधु यांचा मोबाईल पॅटर्न लॉक असल्याने न्याय वैद्यक विभागाला अद्याप उघडता आलेला नाही. नैसर्गिकरीत्या (हार्ट डीसिज) अर्थात वैद्यकीय तांत्रिक भाषेनुसार हृदय रोगाशी संबंधित अचानक झालेल्या त्रासाने मधू यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद आहे.     जिवाला धोका उत्पन्न करू, असे म्हणून सासरकडील काही व्यक्तींनी मधू यांना धमकाविले होते, अशी माहिती मधु यांनी भाग्यश्रीला दिली होती. त्या अनुषंगानेही तपास व्हावा, अशी मागणी भाग्यश्रीने केली. मधूचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. मोबाईलमध्ये काही पुरावे आहेत का? घटनेच्या वेळी तेथे अन्य कोणी होते का; याचा तांत्रिक सहाय्यकामार्फत तपास झाला का? आदींबाबतची विचारणा भाग्यश्रीने पोलिसांकडे केली. याबाबतची आवश्यक कागदपत्रे मिळावीत यासाठीही माहिती अधिकारामध्ये अर्ज केला होता. बहिणीला न्याय द्या, अशा आशयाची भाग्यश्रीने सोशल मीडियावर पोस्ट केली.

या प्रकरणाचा आवश्यक तपास झालेला दिसत नाही. सात महिन्यांनंतरही संबंधित यंत्रणेला बहिणीचा मोबाईल उघडून त्यामध्ये काय आहे हे तपासता आलेले नाही. सीबीआयकडे हे प्रकरण सोपवावे यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.- भाग्यश्री मोटे, अभिनेत्री

मधू मार्कंडेय यांच्या मृत्यूबाबत सर्व शक्यता पडताळून तपास केला. भाग्यश्री मोटे यांनी उपस्थित केलेल्या शंकांचाही तपास केला. त्यांना आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून देऊ.- गणेश जवादवाड, वरिष्ठ निरीक्षक, वाकड पोलिस ठाणे

टॅग्स :Bhagyashree Moteभाग्यश्री मोटेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग