कल्याण : महाविद्यालयात असताना झालेल्या मैत्रीतून प्रेमविवाह करणाºया एका २७ वर्षांच्या विवाहितेने लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना वडवली येथे घडली आहे. पती व सासरच्या मंडळींकडून होणाºया शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे तिच्या आईचे म्हणणे आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.विवाहानंतर काही दिवस सुरळीत गेल्यानंतर डिंपलचा पती सिध्देश याच्यासह सासू पुष्पा (५२), सासरे विलास (५७), आणि नणंद श्रुतिका चांदुरकर (२७) यांनी तिला छळण्यास सुरुवात केली. लग्नात हुंडा न मिळाल्याने हुंड्याची मागणी करत डिंपलने माहेरून पैसे आणावेत, यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. त्याला कंटाळून सोमवारी सकाळी डिंपलने इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे तिची आई संध्या पाटील यांनी खडकपाडा पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी सिध्देश, पुष्पा, विलास, श्रुतिका यांच्याविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.डोंबिवलीतील आयरे रोड परिसरात राहणारी डिंपल पाटील रायगड येथील महाविद्यालयात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होती. येथील विद्यार्थी सिद्देश सिद्धेश जरींग (२८, रा. वडवली) याच्यासोबत तिची मैत्री झाली. २०१८ मध्ये सिध्देशच्या पालकांनी डिंपलला मागणी घातली. त्यावेळी, त्यांनी हुंडा मागितला. मात्र, त्यास विरोध दर्शवल्याने दोन्हीकडील लग्न खर्च करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांचा विवाह २०१९ मध्ये रायगड येथे झाला.
लग्नानंतर तिसऱ्या महिन्यात विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:21 AM