हैवान बापानेच विवाहित लेकीची अब्रू लुटली, मकरसंक्रतीसाठी आली होती माहेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 20:55 IST2022-01-16T20:54:37+5:302022-01-16T20:55:38+5:30
Rape Case : या घटनेनंतर आईसोबत पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या मुलीने वडिलांवर बलात्काराचा आरोप केला आहे.

हैवान बापानेच विवाहित लेकीची अब्रू लुटली, मकरसंक्रतीसाठी आली होती माहेरी
श्योपूर : मध्यप्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात बाप-लेकीच्या नात्याला लाज आणेल असा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील विजयपूरमध्ये हैवान पित्याने आपल्याच 20 वर्षीय विवाहित मुलीला वासनेचा बळी बनवून बलात्काराची घटना घडवली. या घटनेनंतर आईसोबत पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या मुलीने वडिलांवर बलात्काराचा आरोप केला आहे.
वास्तविक घटना विजयपूर पोलीस ठाण्याच्या गोपालपुरा गावातील आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने आपल्या आईसह विजयपूर पोलीस ठाणे गाठून आरोपी वडिलांविरोधात तक्रार दाखल केली, तर बलात्कार पीडितेच्या तक्रारीवरून विजयपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी वडिलाला अटक करण्यात आली आहे.
'मी घाबरलो आणि पोलिसांशी खोटे बोललो, अल्वर बलात्कार पीडितेला घेऊन जाणारा रिक्षाचालकाने दिली कबुली
मित्रांकडून गँगरेप, अनैसर्गिक संबंध, गुप्तांगाला सिगारेटचे चटके; बिल्डरनं पत्नीला दिली थरकाप उडवणारी
मुलगी घरी आली
विजयपूरच्या गोपालपुरा गावात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी पीडित मुलगी तिच्या माहेरी आली होती आणि ती तिच्या वडिलांच्या घरी होती. तर पीडितेची आई तिच्या माहेरी गेली होती. पीडित मुलगी आपल्या बहिणी आणि भावांसह घरात राहत होती आणि रात्री उशिरा तिच्या वडिलांच्या डोक्यात क्रौर्याची भुत शिरले आणि सैतान बनलेल्या बापाने तिच्या 20 वर्षांच्या विवाहित मुलीवर बलात्कार केला.