झारखंडच्या रांची येथील रिम्स हॉस्पिटलमधील एका डॉक्टरचा खरा चेहरा पत्नीसमोर उघड झाला आहे. डॉक्टरच्या पत्नीनं मोबाईलमधील चॅट पाहून लग्न झालेला फोटो शेअर केला. हा फोटो डॉक्टरांच्या दोन्ही गर्लफ्रेंडनं पाहिला. त्यानंतर गोंधळ उडाला. दोन्ही गर्लफ्रेंड थेट पोलीस ठाण्यात पोहचली आणि डॉक्टरांवर लैंगिक शोषणाचा आरोप करत त्यांच्याविरोधात FIR नोंदवली.
राज्यातील सर्वात मोठं हॉस्पिटल रिम्सचे डॉ. कुश कुमारवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. पीडित मुली म्हणतात की, डॉक्टरांनी लग्नाचं आमिष दाखवून आमच्यासोबत संबंध ठेवले. मागील १० वर्षापासून डॉक्टर माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत असा आरोप एका मुलीने केला. तर दुसऱ्या पीडितेसोबत डॉक्टरांचे गेल्या ३ वर्षापासून संबंध आहेत. डॉक्टरांचे आधीच लग्न झालंय याबद्दल पीडित मुलींना कुठलीही कल्पना नव्हती.
१० वर्ष ज्या मुलीसोबत डॉक्टर रिलेशनशिपमध्ये होते तिलाही त्यांचे लग्न झाल्याची भनक लागली नाही. अलीकडेच डॉक्टरच्या पत्नीला नवऱ्याच्या हालचालींवर संशय आला. एकेदिवशी तिने नवऱ्याच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप चॅट पाहिलं. पत्नीने डॉक्टरची हेरगिरी सुरू केली. त्यावेळी गर्लफ्रेंडसोबत डॉक्टरांनी केलेले चॅट तिने वाचले. त्यानंतर पत्नीने तिच्या लग्नाचा फोटो दोन्ही गर्लफ्रेंडसोबत शेअर केला. डॉक्टरांचे आधीच लग्न झाल्याचं कळताच दोन्ही गर्लफ्रेंडचं डोकं फिरलं. ज्याच्यासोबत लग्नाचं स्वप्न पाहत होत्या त्या डॉक्टरचे अधिक लग्न झाल्यानं या पीडिता संतापल्या.
डॉक्टरचा खरा चेहरा पत्नीने त्याच्या गर्लफ्रेंडसमोर उघडकीस आणल्यानंतर दोघींनी पोलीस ठाणे गाठलं. याठिकाणी दोन्ही मुलींनी डॉक्टरांवर लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. पोलिसांनी या पीडित मुलींच्या तक्रारीवरून डॉक्टरविरोधात फसवणूक करून शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप केला. इतकचं नाही तर डॉक्टरांनी मुलींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.