रोहतक - हरियाणा येथील रोहतक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या जिल्ह्यात सख्ख्या भावाने प्रेमविवाह केल्याने त्याच्या बहिणीची आणि तिच्या पतीच्या हत्या केली. फरमाना गावात राहणारा चुलत भाऊ असलेल्या सुरेंद्र आणि पूजा यांचा प्रेमविवाह पाच महिन्यांपूर्वी झाला होता. दोघांचीही घरं गावात समोरासमोर होती. चुलत भाऊ असल्याने घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर पाच महिन्यांपूर्वी दोघांनाही पंचायतीनं गाव सोडून जाण्याची शिक्षा दिली होती. यानंतर दोघेही रोहतकच्या दिल्ली रोडवरील एका कॉलनीत ते दोघे भाड्याने घरात राहत होते. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने मुलीच्या सख्ख्या भावाने चाकूने सपासप वार करून बहिणी, तिच्या पतीची हत्या केली आणि नंतर बहिणीला रुग्णालयाबाहेर टाकून त्याने पळ काढला.
रुग्णालयाने जखमी पूजाच्या गेल्यावर गंभीर जखमा असल्याने उपचारासाठी दुसरे रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र, दुसऱ्या रुग्णालयात पोचण्याआधीच तिने प्राण सोडले. या प्रकरणात पोलिसांनी पूजाचा भाऊ अजय आणि त्याचे दोन चुलत भाऊ, साहिल आणि बबलू यांना अटक केली आहे. घटनास्थळी पोलीस पोचले तेव्हा मेहम-बडसारा रोडनजीक असलेल्या शेतात रक्ताच्या थारोळ्यात पूजाचा पती सुरेंद्र पडला होता.
पोलिसांनी पूजाच्या कुटुंबाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी अजय, साहिल आणि बबलू यांनाही अटक केली. दरम्यान आरोपी अजयनं कबूल केले की त्यानेच बहिणीची आणि तिच्या नवऱ्याची हत्या केली. बहिणीने आपल्याच कुटुंबातील युवकाशी प्रेमविवाह केल्याचा त्याला राग अनावर झाला होता. या रागात त्याने चुलत भावांसोबत हे हत्याकांड घडवून आणले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना
Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली
रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश
एकटीच टीव्ही बघत होती चिमुकली, संधीचा फायदा घेत नराधमाने घरात घुसून केले शोषण
Shushant Singh Rajput : सावधान! सुशांतच्या आत्महत्येनंतर पुन्हा असे प्रकार घडल्यास चित्रपट होऊच देणार नाही, मनसेचा इशारा
Shushant Singh Rajput : १५ वर्षाच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या, तिच्या डायरीत असे लिहिले होते सुशांतबद्दल
हिजबुलच्या दोन दहशतवाद्यांसोबत हात मिळवणी केलेल्या डीएसपीला पाच महिन्यांनी जामीन मंजूर