कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमध्ये देखील बलात्काराच्या घटना थांबत नाही आहेत. गुरुग्राममध्ये एका विवाहित महिलेने असा आरोप केला आहे की, शेजारच्या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला आणि या घटनेबद्दल सांगितले असता तिला जिवे मारण्याची धमकी दिली. सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुरुग्राममधील फर्रुखनगर भागातील एका विवाहित महिलेने बाजूचा रहिवासी असलेल्या जितेंद्र नावाच्या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर विवाहित महिलेने असेही सांगितले की, आरोपीने तिला बलात्काराचा विरोध केल्याने आणि या घटनेबद्दल कोणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली आहे.पीडित विवाहित महिलेचा आरोप आहे की, बलात्कार करण्यापूर्वीही आरोपीने पीडितेला अश्लील फोटो पाठवत होता. फोटो पाठवल्याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडितेसमोर आरोपीच्या वडिलांना अश्लील हावभाव करून ठार मारण्याची धमकी दिली होती. सध्या पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वडील-मुलगा आणि मदत करणाऱ्या तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या तिन्ही आरोपींविरुद्ध भा. दं. वि. कलम 376, 354 डी, 509, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Coronavirus : मुंबई पोलीस दलातील तेरावा बळी, आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू