गाझियाबाद - शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी मोदीनगर इथं एका OYO हॉटेलमध्ये रविवारी दुपारी आयटीआयचा मुलगा हिमांशुने विवाहित महिला मधूचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वत: आत्महत्या करत जीव दिला. मात्र हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी हिमांशुने मधूच्या भावाला आणि पती मोहितला व्हिडिओ कॉल करत ओरडत मधूचा मृतदेह दाखवला.
हिमांशु आणि मधू यांच्या मोबाईल फोनचे शेवटचे लोकेशन ट्रेस करत पोलिसांनी OYO हॉटेल गाठले. त्याठिकाणी दोघेही मृतावस्थेत आढळले. मधूचा मृतदेह बेडवर पडला होता तर हिमांशुचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. पोलीस जेव्हा हॉटेल एबी इन गेस्ट हाऊसच्या खोलीत गेट तोडून पोहचली तेव्हा मधू आणि मोहितचे नातेवाईकही सोबत होते. हॉटेलमध्ये शेफ असलेला मधूचा पती मोहित हा हनुमान कॉलनीत राहत होता. मधूचे माहेर हापुडमधील नली बनखंडा गावातील आहे. सासरच्यांनी तिचा छळ करून तिला घरातून बाहेर काढले होते.
हॉटेलच्या माहितीनुसार, हे दोघे सकाळी साडेदहा वाजता पोहचले होते. मेरठच्या खरखौदा गावातील रहिवासी असलेल्या हिमांशुने मधूला फोन करून बोलावले. मधूचे पहिले लग्न बिजौली गावात झाले होते. मात्र लग्नाच्या काही दिवसांनी तिच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर मोहितसोबत तिचे दुसरे लग्न मार्च महिन्यात झाले. बिजौलीमध्ये हिमांशुसोबत तिने जवळीक साधली. हे दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखायचे. तो मधूला भेटण्यासाठी मोदीनगरला आला होता. त्याने हॉटेलमध्ये रूम बुक केली होती.
मधुच्या लग्नामुळे हिमांशु होता नाराजपोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मधूच्या पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर हिमांशुला मधूसोबत लग्न करायचे होते परंतु मधूच्या कुटुंबाने त्याला नकार दिला. त्यानंतर मधूचे लग्न मोहितसोबत करण्यात आले. मधूचे लग्न झाल्यामुळे हिमांशु नाराज होता. त्याला प्रचंड संताप आला होता. त्यातूनच हिमांशुने हे धक्कादायक पाऊल उचलले. हिमांशुच्या आईचे मधूच्या घरी येणे-जाणे होते. तिनेच मधूचे पहिले लग्न बिजौलीत केली होती.