पतीला सोडून प्रियकराकडे राहण्यासाठी गेली दोन मुलांची आई, बलात्कार करून तरूण फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 09:37 AM2022-12-20T09:37:04+5:302022-12-20T09:37:33+5:30
Crime News : महिलेने पोलिसांना सांगितलं की, फ्रेंडशिप डे च्या दिवशी ती तिच्या पतीसोबत एका हॉटेलमध्ये गेली होती. इथेच तिची भेट रोहित सिंहसोबत झाली होती. नंतर दोघे सोशल मीडियावर बोलू लागले होते.
Crime News : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदुरमध्ये (Indore) महिलांवरील अत्याचारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एका विवाहित महिलेवर तिच्याच प्रियकराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने तरूणाविरोधात रेपची तक्रार दाखल केली आहे.
विवाहित महिला तरूणाच्या प्रेमात इतकी हरवून गेली होती की, ती तिचा संसार सोडून त्याच्यासोबत रहायला गेली. पण तिच्यासोबत दगा झाला. लग्नाचं आमिष दाखवून तरूणाने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा महिलेने लग्नासाठी दबाव टाकला तर तरूण फरार झाला आणि दुसऱ्याच तरूणीसोबत त्याने साखरपुडा केला.
महिलेने पोलिसांना सांगितलं की, फ्रेंडशिप डे च्या दिवशी ती तिच्या पतीसोबत एका हॉटेलमध्ये गेली होती. इथेच तिची भेट रोहित सिंहसोबत झाली होती. नंतर दोघे सोशल मीडियावर बोलू लागले होते. महिलेने रोहितला सांगितलं की, ती विवाहित आहे आणि दोन मुलांची आई आहे. त्यावर रोहित म्हणाला की, तू माझ्याकडे ये आणि नंतर आपण दोघे लग्न करू.
महिलेने पुढे सांगितलं की, पती माझ्यासोबत मारहाण करत होता. पतीच्या या वागण्यामुळे मी फार वैतागले होते. मी याबाबत रोहितला सांगत होती. रोहित नेहमी हेच म्हणत होता की, पतीला सोडून माझ्याजवळ ये. मी तुला काहीच त्रास देणार नाही. अशात मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि मी पतीला सोडलं. आपल्या दोन्ही मुलांना घेऊन मी रोहितसोबत रहायला गेली.
पीडितेने सांगितलं की, पतीचं घर सोडून मी रोहितसोबत राहण्यासाठी गेली होती. सुरूवातीला रोहित आमची खूप काळजी घेतली. आमच्या दोघांमध्ये संबंधही झाले. जेव्हा मी लग्नाबाबत काही बोलत होते तर तो टाळत होता. हळूहळू त्याचं वागणं बदललं. मग तो मला इंदुरमध्ये सोडून सतना येथे गेला.
काही दिवसांनी समजलं की, रोहितने सतनामध्ये एका तरूणीसोबत साखरपुडा केला. मी रोहितला फोन केला, पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही.
महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विवाहित महिलेला लग्नाचं आमिष दाखवून रेप करण्याची केस आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही चौकशी सुरू केली आहे. लवकरच तरूणाला अटक केली जाईल.