बिहारच्या बेतिया येथे एक विवाहित महिला आपल्या मुलाला घेऊन प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. तिने नंतर मंदिरात जाऊन प्रियकराशी लग्न केलं. तसेच हा व्हिडीओ व्हायरल करून प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांवर दाखल करण्यात आलेला एफआयआर खोटा असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे संपूर्ण प्रकरण जिल्ह्यातील बलथर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून, येथील एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकरासोबत मंदिरात लग्न केल्यानंतर व्हिडीओ बनवून सोशल मीडिया आणि Whatsapp ग्रुपवर व्हायरल केला होता.
व्हायरल व्हिडीओमध्ये महिलेने सांगितले आहे की, लग्नाआधीच तिचे प्रियकर पिंटूवर प्रेम होते. मात्र तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न बलथर पोलीस स्टेशन हद्दीतील मुरली गावात राहणाऱ्या कमलेश्वर पासवान यांच्या मुलाशी तिच्या इच्छेविरुद्ध करून दिले, जिथे ती आनंदी नव्हती. लग्नानंतरही ती तिचा प्रियकर पिंटूशी फोनवर बोलायची. पण तिची सासू नेहमी बोलत असताना तिला शिवीगाळ करायची, याला कंटाळून तिने प्रियकरसोबत पळून जाऊन लग्न केले आणि आता व्हिडीओ जारी करून तिने प्रियकर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध दाखल केलेला एफआयआर खोटा असल्याचे जाहीर केले आहे.
या प्रकरणी महिलेचे सासरे कमलेश्वर पासवान यांनी बलथर पोलीस ठाण्यात महिलेचा प्रियकर आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे की, आपली सून 27 डिसेंबर रोजी बाहेर गेली होती, त्यावेळी पिंटू आणि त्याच्या नातेवाईकांनी तिचे अपहरण केले होते. दुसरीकडे, पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून तपास सुरू आहे.
दुसरीकडे, बलथर पोलीस ठाण्याचे अध्यक्ष अरविंद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या अपहरणाचा गुन्हा तिच्या सासरच्या मंडळींनी नोंदवला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. महिलेने तिच्या प्रियकरासोबतचा एक व्हिडीओ जारी केला असून तोही पाहिला आहे. या महिलेला लवकरच शोध घेण्यात येत असून कोर्टात हजर करण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"