विवाहित महिला होती लिव्ह इनमध्ये; तिसऱ्याशी ठेवायचे होते संबंध म्हणून तिला प्रियकराने गाडले
By पूनम अपराज | Published: March 4, 2021 09:23 PM2021-03-04T21:23:02+5:302021-03-04T21:23:33+5:30
Murder :महिलेला गाडण्यासाठी घरात आधीच एक खड्डा बनविला गेला होता आणि सख्खा भाऊ, चुलत भाऊ आणि आईने मिळून 3 ते 4 फूटांच्या खड्ड्यात त्या महिलेचा मृतदेह पुरला आणि त्यावर सिमेंट लावले. घटनेनंतर आरोपी फरार होता.
मध्य प्रदेशच्या खरगोन येथील आपल्या नवीन घरात, आपल्या प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेवर चारित्र्यावर संशय घेत तिची हत्या करण्यात आली. महिलेला गाडण्यासाठी घरात आधीच एक खड्डा बनविला गेला होता आणि सख्खा भाऊ, चुलत भाऊ आणि आईने मिळून 3 ते 4 फूटांच्या खड्ड्यात त्या महिलेचा मृतदेह पुरला आणि त्यावर सिमेंट लावले. घटनेनंतर आरोपी फरार होता.
या हत्येतील मुख्य आरोपीला पोलिसांनीअटक केली आहे. या हत्येत सहकार्य करणाऱ्या आई, भाऊ आणि चुलतभावाला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. जिल्हा मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावर भीकनगाव पोलीस स्टेशन परिसरातील मोहनखेरी येथे बंद घराच्या दुसर्या खोलीत दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सिमेंट प्लास्टरखाली दबलेल्या महिलेचा मृतदेह उत्खनन करून बाहेर काढण्यात आल्याने खळबळ उडाली होती. 3 जानेवारी 2021 रोजी पोलिस ठाणे भीकनगाव येथे हरवलेल्या आईची माहिती मुलीने दिली. मुलीला छायाबाई न सांगताच गेल्याची माहिती मिळाली.
संतोष गोलकर याच्याशी तिचे प्रेमसंबंधा असल्यामुळे मोहनखेडी या गावात गेली असल्याची शक्यता कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली होती. संतोष गोलकर आणि छाईबाईंचा शोध सुरू करण्यात आला. 27 जानेवारी 2021 रोजी छाताबाईची हत्या केल्यानंतर संतोषने मृतदेह आपल्याच घरात पुरविला असल्याची माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळताच एसडीएम भीकनगाव यांना घर खोदण्यासाठी लेखी परवानगी मिळाली आणि कार्यकारी दंडाधिकारी नायब तहसीलदार भीकनगाव यांच्या उपस्थितीत संतोष गोलकर यांच्या घरात खोदकाम केले, तर छाईबाईचा मृतदेह सुमारे ३ फूट ५ इंचाच्या खोलीवर सापडला. या कालावधीत, परिस्थितीजन्य पुरावे व विधानांच्या आधारे, आयपीसीच्या कलम ३०२, २०१, ३४ गुन्हा दाखल करण्यात आला.
खुनाच्या घटनेला गांभीर्याने घेत पोलिस अधीक्षक खरगोन शैलेंद्र सिंग चौहान यांनी आरोपींना लवकर अटक करण्याचे निर्देश दिले. फरार आरोपी संतोषचे वडील किशोर गोलकर वय 42 वर्ष रा. मोहनखेरी यांच्या अटकेसाठी पोलिस अधीक्षकांनी दहा हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. या कारवाईसाठी माहिती देणाऱ्यांना व पोलिस कर्मचार्यांना सक्रीय करून माहिती देण्यात आली, याचा परिणाम म्हणून भीकनगाव पोलिसांनी हत्येतील मुख्य आरोपी संतोषला अटक केली.
आरोपींनी विचारपूस केल्यावर सांगितले की, त्याचे आणि छाईबाई यांचे प्रेमसंबंध होते, दोघांनाही लग्न करायचे होते, त्यासाठी संतोषने आपली जमीन विकली आणि नवीन घर बांधले आणि इतर व्यवस्था केली. पण संतोष गोलकर यांना छाईबाईच्या चारित्र्यावर संशय होता. त्याने गावातील मजूर दामडिया यांना पाण्याची टाकी बनवण्यास सांगितले आणि 200 रुपये मजुरी देण्याबाबत सांगितले आणि घर खोदले. मग त्याने छायाबाईला निमित्ताने घरी बोलावून तिची हत्या केली आणि घराच्या खड्ड्यात आई साकूबाई, भाऊ सुनील आणि चुलतभाऊ मिस्त्री यांच्या मदतीने मृतदेह खड्ड्यात पुरला. जेणेकरून कोणालाही शंका नसावी. .
घटनेनंतर मुख्य आरोपी संतोष फरार झाला. ५ फेब्रुवारीला या प्रकरणातील सहआरोपी सुनील(28), अनिल (२८), साकुबाई (58) यांना अटक करून न्यायालयात हजर केले. या घटनेतील मुख्य आरोपी संतोषला बैतूल जिल्ह्यातून पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.