शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

पतीकडे परत गेलेल्या प्रेयसीला आणायला गेला प्रियकर, तिने दिला नकार आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 12:06 PM

डोंबिवली पूर्व भागात राहणाऱ्या महिलेची दिनेश तिवारी नावाच्या व्यक्तिसोबत मैत्री होती. नंतर मैत्रींच रूपांतर प्रेमात झालं. मात्र, महिला ही विवाहित होती.

विवाहित प्रेयसीवरील रागात एका प्रियकराने तिच्या तीन वर्षीय मुलीलं अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवलीत घडली असून महिलेने पोलिसात प्रियकराविरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी महिलेच्या तीन वर्षीय मुलीचं अपहरण करणाऱ्याला शोधून काढलं. 

डोंबिवली पूर्व भागात राहणाऱ्या महिलेची दिनेश तिवारी नावाच्या व्यक्तिसोबत मैत्री होती. नंतर मैत्रींच रूपांतर प्रेमात झालं. मात्र, महिला ही विवाहित होती. तिला दोन लहान मुली आहेत. तरी महिलेने कशाचा विचार न करता प्रेमाला महत्व दिलं. तिने प्रियकरासाठी संसार सोडला. नवरा आणि मुलींना सोडून ती प्रियकरासोबत राहू लागली. पण काही दिवसातच दोघांमध्ये वाद होऊ लागले होते. अशात महिला वैतागली आणि तिने आरोपी दिनेश तिवारी याची साथ सोडली. तिने आपल्या पतीची माफी मागितली आणि ती पतीसोबत राहू लागली. (हे पण वाचा : १५ व्या वर्षीच 'ती' बनली गर्भवती; आरोपी म्हणतो, "कुछ नही होता. मै शादी करूंगा..!")

प्रेयसीचं हे वागणं न पटल्याने संतापलेला दिनेश तिवारी महिलेच्या घरी आला आणि पुन्हा सोबत चल असा तगादा त्याने तिच्यामागे लावला. मात्र, यावेळी महिलेने सोबत येण्यास नकार दिला. त्यामुळे दिनेश आणखीन संतापला. त्याने महिलेला त्रास देण्याचं ठरवलं. त्याने तिच्या मुलीचं अपहरण करण्याचा कट रचला. मुलगी खेळत असताना त्याने चॉकलेटचं आमिष दाखवून तिचं अपहरण केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सगळीकडे मुलीचा शोध घेतल्यावरही सापडत नसल्याने महिलेने पोलिसात तक्रार दिली. (हे पण वाचा : लग्नात जाण्यावरून शिक्षक दाम्पत्यात झाला वाद; पतीने पत्नी अन् मुलाची केली हत्या, नंतर केली आत्महत्या)

महिलेने मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. यावेळी महिलेने आरोपी दिनेश तिवारी या व्यक्तीशी वाद झाल्याचं सांगितलं. यावरून पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले. त्यानंतर अवघ्या सहा तासात पोलीस अधिकारी श्रीकृष्ण गोरे यांच्या पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या. दरम्यान, पोलिसांनी तीन वर्षाच्या चिमुकलीस तिच्या आईच्या स्वाधीन केलं आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवली