जयपूर - असं म्हणतात की, प्रेम आंधळं असतं. अशात लोक प्रेमात पडले की, कशाचाही विचार न करता काहीही करायला तयार होतात. पण याच आंधळेपणामुळे अनेकांची फसवणुकही होते. राजस्थानच्या (Rajasthan Crime News) एका महिलेसोबत असंच झालं. एका विवाहित महिलेचा डेटिंग अॅपच्या माध्यमातून एका व्यक्तीसोबत संपर्क झाला आणि मग त्यांच्यात बोलणं सुरू झालं. हळूहळू दोघे प्रेमात पडले. इतकंच नाही तर ही महिला नंतर या व्यक्तीसोबत पत्नीसारखी राहू लागली होती. पण त्यानंतर व्यक्तीने महिलेसोबत असं काही केलं ज्याने तिला धक्का बसला.
राजस्थानच्या जयपूरमधील एका मुलीची आई असलेल्या महिलेचा डेटिंग अॅपवर उत्तर प्रदेशच्या बांदामधील एका व्यक्तीसोबत संपर्क झाला. नंतर दोघे प्रेमात पडले. काही दिवसात ते पती-पत्नीसारखे सोबत राहू लागले.
मीडिया रिपोर्टनुसार, या व्यक्तीला हत्येच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं होतं. इतकंच नाही तर त्याला जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती. सध्या तो जामिनावर तुरूंगातून बाहेर आला होता. पण त्याच्या प्रेमात वेडी झालेली महिला राजस्थान सोडून त्याच्याजवळ बांदा येथे गेली. सगळं काही ठीक सुरू होतं. पण आरोपीची नजर महिलेच्या अल्पवयीन मुलीवर होती.
मीडिया रिपोर्टनुसार, आरोपीने महिलेच्या अल्पवयीन मुलीवर रेप केला. मुलीने याचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने तिचा एक हातही मोडला. महिला बाहेरून जेव्हा घरी आली तेव्हा मुलीने सगळा प्रकार सांगितला. महिलेला ते सगळं ऐकून धक्का बसला आणि ती लगेच पोलिसात व्यक्तीविरोधात तक्रार देण्यासाठी गेली. पोलिसांनी लगेच व्यक्तीला अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
असं सांगण्यात आलं की, अल्पवयीन मुलीवर रेप करणारा आरोपी आणि महिलेची भेट एका डेटींग अॅपवर झाली होती. त्यानंतर त्यांची जवळीक वाढली. दोघे पती-पत्नीसारखे 1 वर्षापासून सोबत राहत होते. या व्यक्तीला 2003 मध्ये हत्येच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं होतं. तो जामीनावर तुरूंगातून बाहेर आला होता. आता त्याला अल्पवयीन मुलीवर रेपच्या केसमध्ये अटक करण्यात आली आहे.