मुंबई - नागपाड्यातील व्यापाऱ्यांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या अट्टल चार गुन्हेगारांना नागपाडा पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली आहे. कुख्यात गुंड छोटा शकीलसाठी काम करणाऱ्या या आरोपींविराधात मुंबई ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिटी सेंटर मॉलमधील काही व्यापारी दिवसभर केलेल्या व्यवसायाचे पैसे रात्री घरी घेऊन जात असत. अशा व्यापाऱ्यांवर पाळत ठेवून त्यांना लुटण्याचा कट काही अट्टल गुन्हेगारांनी आखल्याची गुप्त माहिती नागपाडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बागवे, पोलीस निरीक्षक विद्याधर काळकुंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश मांजरेकर, पोलीस उपनिरीक्षक कदम, पाटील व पथकाने सापळा रचला. रविवारी सायंकाळी बीआयटी चाळ, मुंबई सेंट्रल येथे यातील आरोपी पोलिसांच्या नजरेस येताच त्यांना पोलिसांनी घेरले व चार जणांना ताब्यात घेतले आणि एकजण पळून जाण्यास यशस्वी ठरला. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे एक गावठी कट्टा, दोन चॉपर, एक खेळण्यातील पिस्तुल, मोटारसायकल, मिरची पूड आदी साहित्य जप्त करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली. अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून ते कुख्यात गुंड छोटा शकीलसाठी काम करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या विरोधात मुंबई ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे आदी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दरोड्याच्या तयारीत असलेले चौकूट शस्त्रांसह जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 9:39 PM
मुंबई सेंट्रल येथे यातील आरोपी पोलिसांच्या नजरेस येताच त्यांना पोलिसांनी घेरले व चार जणांना ताब्यात घेतले आणि एकजण पळून जाण्यास यशस्वी ठरला. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे एक गावठी कट्टा, दोन चॉपर, एक खेळण्यातील पिस्तुल, मोटारसायकल, मिरची पूड आदी साहित्य जप्त करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली. अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून ते कुख्यात गुंड छोटा शकीलसाठी काम करीत असल्याचे उघड झाले आहे.
ठळक मुद्देकुख्यात गुंड छोटा शकीलसाठी काम करणाऱ्या या आरोपींविराधात मुंबई ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. रविवारी सायंकाळी बीआयटी चाळ, मुंबई सेंट्रल येथे यातील आरोपी पोलिसांच्या नजरेस येताच त्यांना पोलिसांनी घेरले व चार जणांना ताब्यात घेतले मुंबई ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे आदी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत