पुणे : पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टची पॉवर आॅफ अॅटर्नी आपल्याकडेअसल्याचे सांगून केस मिटवायची असेल तर १ कोटी रुपयांची खंडणी मागून ४० लाख रुपये जबरदस्तीने घेतल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मारुती निवृत्ती नवले (वय ७१, रा. रचना फार्म, एनडीए रोड) यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २० व २१ सप्टेबर २०१२ मध्ये एरंडवणे येथीलसंस्थेच्या कार्यालयात घडला.याबाबत पोलिसांनी सांगितले की, चैनसुख गांधी यांचे मुळशी तालुक्यातील अंबडवेट येथील पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टची मिळकत व शाळेबाबत असलेल्या मतभेदाचा फायदा घेऊन चैनसुख गांधी यांना नवले यांच्याविरोधात बऱ्हाटे यांनी गुन्हा दाखल करायला लावला. त्यानंतर सिंहगड एज्युकेशन संस्थेच्या कार्यालयात येऊन नवले यांना बऱ्हाटे यांनी तुम्ही आमचे परस्पर गांधी यांच्याशी बोलून वाद मिटवता काय? मी ही केस मिटवू देणार नाही. माझ्याकडे पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टची पॉवर आॅफ अॅटर्नी आहे. केस मिटवायची असेल.तर १ कोटी रुपये द्यावी लागेल. नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली.त्याला घाबरुन नवले यांनी त्यांना २० लाख रुपये रोख व २० लाख रुपयांची १०० ग्रॅम सोन्याची ६ बिस्किटे दिली. बऱ्हाटे यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याचे समजल्यावर नवले यांनी आता ही फिर्याद दिली आहे.
सिंहगड एज्युकेशनच्या मारुती नवले यांची रवींद्र बऱ्हाटे यांच्याविरोधात ४० लाखांच्या खंडणीची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 11:42 AM
केस मिटवायची असेल तर एक कोटी रुपयांची खंडणी मागून 40 लाख जबरदस्तीने वसूल केल्याची तक्रार
ठळक मुद्देबऱ्हाटे यांच्याविरोधात चौथा गुन्हा