शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार, वडिलांना मारहाण, सर्व आरोपी अल्पवयीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 12:08 AM

Crime News : श्रमजीवी संघटनेच्या अंबाडी येथील मध्यवर्ती कार्यालयात शनिवारी दुपारी अंबाडीजवळील एका खेडेगावातील एका व्यक्तीने पत्नी आणि १३ वर्षीय मुलीसोबत येऊन गावात आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार केली.

वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील अंबाडीजवळील एका गावात १३ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार आणि मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीडित आणि तिच्या कुटुंबीयांना धीर देत गणेशपुरी पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना शनिवारी मध्यरात्री अटक केली. श्रमजीवी संघटनेच्या अंबाडी येथील मध्यवर्ती कार्यालयात शनिवारी दुपारी अंबाडीजवळील एका खेडेगावातील एका व्यक्तीने पत्नी आणि १३ वर्षीय मुलीसोबत येऊन गावात आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार केली. मात्र मारहाणीचे कारण सांगण्यास ताे टाळत हाेता. संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी त्याच्या पत्नीला आणि मुलीला बाजूला विश्वासात घेऊन विचारले असता गावातील चार अल्पवयीन मुलांनी दोन महिन्यांपूर्वी गावातील एका पडीक बंगल्यात तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार त्यांना समजला. त्यानंतर लागलीच त्यांना गणेशपुरी पोलीस ठाण्यात नेत पोलिसांना माहिती दिल्यानंतर या प्रकरणात तथ्य आढळल्यानंतर पोलिसांनी गावातील चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर अत्याचार आणि मारहाणीचे दोन गुन्हे दाखल केले आहेत. 

सुधारगृहात रवानगीआरोपींना बालसुधारगृहात ठेवल्याची माहिती गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राम भालसिंग आदींनी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी