शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

Bulli Bai App: बुली बाई ॲपचा मास्टरमाइंड म्हणे, मुंबई पोलिसांनी केलेली अटक चुकीची, मी एकटाच आरोपी...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 7:24 AM

Bulli Bai App case: दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत बिश्नोईने @giyu44 या अकाउंटवरून मुंबई पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी दोघांचा सहभाग नसल्याचे सांगितले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिल्ली पोलिसांनी बुली बाई ॲपचा मास्टरमाइंड नीरज बिश्नोई याला अटक केल्यानंतर त्याने तयार केलेल्या ट्विटर हॅण्डलवरून मुंबई पोलिसांनी केलेली अटक चुकीची असल्याचे सांगितले आहे. याबाबत दिल्ली पोलीस त्याच्याकडे अधिक तपास करत आहेत.

बुली बाई ॲपचे ट्विटर हॅण्डल बनविणाऱ्या मुख्य आरोपी श्वेता सिंहसह मयंक रावत (२१) आणि विशाल कुमार झा (२२) या तीन आरोपींना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याच प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांकड़ून अन्य आरोपींचा शोध सुरू असताना, दिल्ली पोलिसांनी ॲप बनविणाऱ्या बिश्नोई याला अटक केली.

दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत बिश्नोईने @giyu44 या अकाउंटवरून मुंबई पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी दोघांचा सहभाग नसल्याचे सांगितले आहे. याबाबत त्याने अनेक ट्विट केले आहे. त्यानुसार, दिल्ली पोलीस अधिक तपास करत आहेत. नीरज हा मूळचा जोरहाटचा राहणारा असून, तो भोपाळमध्ये शिकतो. त्यानेच बुली बाई हे ॲप गिटहब प्लॅटफॉर्मवर निर्माण केले. तसेच तो बुली बाईचा मुख्य ट्विटर अकाउंट होल्डरही आहे, असे पोलिसांनी सांगितले. नीरजला दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स ्युजन अँड स्ट्रॅटेजिक शाखेने अटक केली. त्याने हे ॲप तयार केल्याची कबुली दिली. त्याच्या लॅपटॉपमध्ये या ॲपचे काही पुरावे सापडले आहेत, असे उपपोलीस आयुक्त (आयएफएसओ) के. पी. एस. मल्होत्रा यांनी सांगितले.

या ॲप प्रकरणात कथित सहभागाच्या आरोपावरून आतापर्यंत नीरज बिश्नोईसह ४ जणांना अटक झालेली आहे. या ॲपवर शेकडो मुस्लीम महिलांची लिलावासाठी यादी बनवण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या इतर ३ जणांमध्ये उत्तराखंडमधील १८  वर्षांच्या श्वेता सिंह या तरुणीचा समावेश आहे. याप्रकरणी ही तरुणीही मुख्य आरोपी आहे.

टॅग्स :Policeपोलिस