कल्याण - कल्याणच्या स्टेशन परीसरात नीलम गल्लीत मटका किंग उर्फ मुन्ना उर्फ जिग्नेश ठक्कर याच्यावर अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केला. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी जिग्नेशला फोर्टीज रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. नंतर फोर्टीज रुग्णालयात डॉक्टराने जिग्नेशला मृत घोषित केलं. जिग्नेशची हत्या करणारे आरोपी धर्मेश उर्फ नन्नू नितीन शहा व जयपाल उर्फ जापान यांच्यासह अन्य दोन जणानी केली आहे. हे चारही आरोपी फरार झाले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहे. तपास कामाकरीता पाच तपास पथके तैनात करण्यात आली आहे.जिग्नेश ठक्कर याचे कल्याण, उल्हासनगर आणि ठाणे परिसरात अनेक ठिकाणी मटका आणि रम्मी क्लब असून तो क्रिकेट मॅचवरदेखील सट्टा लावत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेदरम्यान जिग्नेश हा कल्याण स्टेशन परिसरात असलेल्या आपल्या ऑफिसमध्ये बसला होता. आपल्या ऑफिसमधून घरी जाण्यासाठी रात्री जिग्नेश कार्यालयाच्या बाहेर आला. त्याचवेळी घात लावून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी जिग्नेश ठक्करवर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.तृप्ती स्टोन क्रेशरच्या कार्यालयात जिग्नेश असताना त्याठिकाणी आरोपी आले. त्यांनी त्याच्यावर पाच राऊंड फायर केले. कोणी मध्ये आले तर ठोख देंगे असा इशारा देऊन आरोपी पसार झाले. जिग्नेशला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याठिकाणी डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे घोषित केले. जिग्नेश व नन्नू शहा हे लहानपणा पासूनचे मित्र होते. नन्नू शहाच्या विरोधात खून, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे गंभीर स्वरुपाचे 15 ते 2क् गुन्हे दाखल आहेत. जिग्नेशच्या विरोधात खंडणी व जबरी चोरी असे गंभीर स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल होते. एका खंडणीच्या गुन्ह्यात जिग्नेश व नन्नू शहा हे सह आरोपी होते. 29 जुलै रोजी नन्नू शहा याचा मित्र चेतन पटेल व जिग्नेश यांच्यात शिवीगाळ व हाणामारीचा प्रकार घडला होता. पटेल याने बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे जिग्नेश सह सऊद अक्रम शेख, मनिष श्यामजी चव्हाण यांच्या विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिग्नेशही तक्रार दिली होती. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चेतन पटेल याच्या विरोधातही अदखल पात्र गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा राग नन्नूच्या मनात होता. तसेच पूर्वीचा आर्थिक वाद होता. या कारणावरुन नन्नू याने त्याच्या साथीदारासह जिग्नेशची गोळ्य़ा घालून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहेत.पोलिसांनी जिग्नेशचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरात चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी परिसरातले सीसीटीव्ही तपासले जाणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी
मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल
तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्...
रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल