कानपूर येथील डेंटल कॉलेजमध्ये एमबीबीएस विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हॉस्टेलच्या बेसमेंटमध्ये मृतदेह आढळून आला. हत्येचा आरोप करत मृताच्या कुटुंबीयांनी पोलीस आणि कॉलेज व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आपल्या मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. त्याची हत्या करण्यात आली आहे. एसआयटी चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. घटनेच्या दोन दिवस आधी विद्यार्थ्याचा वाढदिवस होता. तो मित्रांना वाढदिवसाची पार्टी देत होता.
ही संपूर्ण घटना बिथूर पोलीस स्टेशन परिसरातील रामा डेंटल कॉलेजचं आहे, जिथे रविवारी हॉस्टेल बेसमेंटमध्ये एमबीबीएस सेंकड ईयरचा विद्यार्थी साहिल सारस्वत याचा मृतदेह आढळून आला. विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
मुलाचे वडील बृजमोहन सारस्वत यांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिलच्या डोक्यावर जखमा आढळून आल्या आहेत. शरीरावर अनेक ठिकानी खुणा आढळल्या. वैयक्तिक वादातून त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी योग्य तपास केला नसल्याचा आरोपही केला जात आहे. साहिल त्यांचा एकुलता एक मुलगा होता. सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे.
वाढदिवसाची दिली पार्टी
रविवारी सकाळी कॉलेजच्या बेसमेंटमध्ये साहिलचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सुरुवातीला मृत्यू संशयास्पद मानून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचलेल्या बृजमोहन सारस्वत यांनी साहिलची हत्या झाल्याचा दावा केला. 24 तारखेला त्यांचा मुलगा साहिलचा वाढदिवस होता, असे ते सांगतात. त्याने पार्टी दिली. काल रात्रीही मी त्याच्याशी फोनवर बोललो. सगळं नॉर्मल होतं. काहीही चुकीचे वाटत नव्हते. त्यानंतर सकाळी मृत्यूची बातमी आली.
"एकुलत्या एका मुलाची हत्या"
बृजमोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिलची हत्या झाल्याचं पोलीस आणि कॉलेज प्रशासनाने लपवण्याचा प्रयत्न केला. मारेकरी कॉलेजमध्येच आहेत. साहिल माझा एकुलता एक मुलगा होता. त्याचा मृतदेह जिथे सापडला तिथे सगळीकडे रक्त पसरले होते. चेहऱ्यावर खुणा होत्या. डोक्यावर रॉड आदींनी मारल्याच्या खुणा होत्या. त्याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह बेसमेंटमध्ये टाकण्यात आला.