मुंबई :
अंमली पदार्थ विरोधी विभागाने एमडी तस्करीची साखळी मोडून केलेल्या कारवाईत आतापर्यंत ४ हजार ८०० कोटीचा एमडी साठा जप्त केला आहे. याच प्रकरणात अटक केलेल्या ऑरगॅनिक रसायनशास्त्रातील पदवीधर आणि दोन कंपन्यांचा सीईओ राहिलेल्या एमडी तस्करीचा मास्टरमाईंडप्रेमप्रकाश सिंग (५२) याच्या ड्रग्ज तस्करीतून कमावलेल्या १९ कोटी ५८ लाख किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे.शिवाजीनगर परिसरातून शमशुल्ला खान (३८) या ड्रग्ज तस्कराला २५० ग्रॅम एमडीसह ताब्यात घेत अटक केल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या वरळी कक्षाने एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत मास्टरमाईंड प्रेमप्रकाश सिंह (५२) याच्यासह अंबरनाथ आणि गुजरातमधील केमिकल फॅक्टरींचे मालक अशा एकूण ०८ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींजवळून तब्बल ०२ हजार ४३५ रुपये किंमतीचे ०१ हजार २१८ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले होते. तर, १ हजार २०० किलोंचा एमडी सदृश्य मालसूद्धा जप्त केला होता. याचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले होते. याचा अहवाल सकारात्मक आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे याची किंमत ४ हजार ८५६ कोटी ४१ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.गुन्हयाच्या तपासादरम्यान गुन्हयातील मुख्य आरोपी प्रेमप्रकाश पारसनाथ सिंग याच्या मालमत्तेची व बँक खात्याची माहिती घेतली असता त्याने अंमली पदार्थाच्या व्यापारातून बेकायदेशीररित्या १८ कोटी ४३ लाख ५६ हजार ३३४ रुपये किंमतीचे २ फ्लॅट, ९ गाळे, १ कार तसेच त्याचे कुटुंबातील सदस्य यांची ०६ बँक खात्यातील शिल्लक रक्कम १ कोटी १४ लाख ८८ हजार २१६ रूपये संपादीत केल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार, गुन्हे शाखेने त्याच्या एकूण १९ कोटी ५८ लाख ४४ हजार ५५० रुपये किंमतीची मालमत्ता जप्त केली असून याबाबतच अहवाल संबंधितां सक्षम प्राधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.