मुंबई - १५ जुलै रोजी दहशतवाद विरोधी पथक, जुहू युनिट, मुंबई यांना खात्रीलायक बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दोन इसम हे एमडी हा अमली पदार्थ विकण्याकरीता वाहिद अली कंपाउंड, ९० फुट रोड साकीनाका येथे येणार आहेत. जुहू युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सदरची माहिती वरिष्ठांना कळवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जुहू युनिटचे पोलीस अधिकारी व अंमलदारसह वाहिद अली कम्पाऊण्ड, ९० फीट रोड, साकीनाका याठिकाणी सापळा लावला असता दोन इसम हे एकूण २ किलो ७५० ग्रॅम एमडी या अमली पदार्थासह जाळ्यात सापडले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले.दोन्ही आरोपींविरूध्द एटीएसने कलम ८(क) सह २०, २९ एन डी पी एस कायदा १९८५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. नमूद दोन्ही आरोपींना आज अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारीयेथे हजर करण्यात आले असून कोर्टाने २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नमूद आरोपींकडे करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत मुंबई व महाराष्ट्रामध्ये एमडी या प्रतिबंधित अमली पदार्थाचे वितरण करण्याच्या कामामध्ये सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेल्या २ किलो एमडी या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजार भावाप्रमाणे किंमत अंदाजे रूपये १ करोड १० लाख इतकी आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
लॉकडाऊनमध्ये नोकरीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार; पीडितेला घरात डांबून ठेवलं
निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
ताई मला वाचव! हबीब मला मारून टाकेल; रिदाने मृत्यूपूर्वी केला होता व्हिडिओ कॉल, म्हणाली होती...
हत्येनंतर चोराने बलात्कार केला; विवस्त्र मृतदेहाला फ्रिजमध्ये ठेवायचा प्रयत्न फसला
९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल
गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा