मीरारोड - काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमडी (मेफोड्रोन) हे अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका तस्करास मीरा-भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोमवारी रात्री अटक केली आहे. त्याच्या कडून २५ लाख रुपये किमतीचे एमडी अमलीपदार्थ जप्त केले आहे .
दहिसर चेकनाक्या जवळील ठाकूर मॉलसमोर चारचाकी मोटारीतून एक इसम एमडी हे अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मीरा - भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना मिळाली होती . वनकोटी सह सहाय्यक निरीक्षक विलास कुटे व त्यांच्या पोलीस पथकाने साफळा रचला होता . माहिती नुसार वर्णनाची एक मोटार आली असता पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात अमली पदार्थ आढळून आले . याप्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.