गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 14 जणांना शौर्य पदक जाहीर करण्यात आले. त्यात एका सहायक पोलीस निरीक्षकासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पण काल नक्षली हल्ल्यात पोलीस जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्रदिनाच्या सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
राष्ट्रपती कार्यालयाकडून सन्मानपात्र पोलिसांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील सहायक पोलीस निरीक्षक राजेश ज्ञानोबा खांदवे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश दुगुजी कोवासे, हवालदार रतीराम रघुराम पोरेटी, राकेश रामसू हिचामी, नाईक मनीष पुंडलिक गोरले, प्रदीपकुमार रायभान गेडाम, शिपाई गोवर्धन जनार्दन वाढई, कैलास काशीराम उसेंडी, कुमारशहा वासुदेव किरंगे, शिवलाल रूपसिंग हिडको, राकेश महादेव नरोटे, वसंत नानका तडवी, सुभाष पांडुरंग उसेंडी, रामेश वेंकन्ना कोमिरे यांचा समावेश आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी
Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी
सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत
डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको
सुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...
Video : देव तारी त्याला कोण मारी! कारने फरफटत नेऊनही महिला बचावली, रुग्णालयात उपचार सुरु