सौरभची निर्घृण हत्या केल्यानंतर जेलमध्ये बंद असलेल्या साहिल आणि मुस्कानच्या विचित्र मागण्यांमुळे जेल अधिकारीही त्रस्त आहेत. दोघांनीही जेलमधील एकाच बॅरेकमध्ये एकत्र राहण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाने नियमांचा हवाला देऊन हे नाकारलं. "आम्हाला फक्त एकदा भेटू द्या" असं ते अधिकाऱ्यांना सांगत आहेत. जेल अधीक्षक विरेश राज शर्मा यांनी यासाठी नकार दिला आहे.
मुस्कानने जेलमध्ये शिवणकाम शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महिला बॅरेकमध्ये शिवणकाम शिकायला सुरुवात केली आहे. कुटुंबातील सदस्यांनी तुरुंगात असलेल्या मुस्कान आणि साहिलला भेटण्यास नकार दिला आहे. साहिलची आजी फक्त एकदाच त्याला भेटायला गेली होती. जेलमध्ये आल्यानंतर साहिल आणि मुस्कानने जेलरला एकाच बॅरेकमध्ये एकत्र राहण्याचा हट्ट केला होता.
"मुस्कान आणि साहिल विवाहित नाहीत"
जेल नियमावलीनुसार, दोघांनाही एकत्र ठेवता येत नाही आणि त्यांना भेटण्याची परवानगी देण्याचा कोणताही नियम नाही असं सांगितलं. जर ते विवाहित असतील तर त्यांना १५ दिवसांतून एकदा भेटण्याचा नियम आहे. मुस्कान आणि साहिल विवाहित नाहीत. अशा परिस्थितीत, हा नियम त्यांना लागू होत नाही. दोघांना भेटता येणार नाही. दोघांना वकील मिळावा अशी मागणी याआधी केली होती.
सौरभचे तुकडे केले आणि ड्रममध्ये टाकले
ब्रह्मपुरी येथील रहिवासी मुस्कानने तिचा प्रियकर साहिलसह मिळून तिचा पती सौरभची निर्घृण हत्या केली होती. दोघांनीही सौरभचे तुकडे केले आणि ते एका ड्रममध्ये टाकले. हत्येनंतर दोघेही हिमाचल प्रदेशात फिरत होते आणि मजा करत होते. जेव्हा ते परत आली आणि सौरभबद्दल विचारपूस करण्यात आली तेव्हा मुस्कानने तिच्या आईला हत्येबद्दल सांगितले. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि मुस्कान आणि साहिलला अटक केली. मुस्कानची मुलगी पिहू तिच्या आजीसोबत राहत आहे.