उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. चार वर्षापूर्वी या तरुणाने आंतर जातीय विवाह केला होता, त्या तरुणाची पत्नी मुस्लीम धर्माची असल्याचे सांगण्यात येत आहे. तरुणाला मुलीच्या कुटुंबियांनी धर्मांतर करण्यासाठी तगादा लावल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. काल आत्महत्येपूर्वी तरुणाने आपल्या पत्नीशी ४० मिनिटे फोनवरुन चर्चा केल्याचे समोर आले आहे.
ही घटना मेरठच्या नौचंडी पोलीस ठाणे परिसरातील चित्रकूट कॉलनीची आहे, या ठिकाणी दुष्यंत नावाचा तरुण डीजे म्हणून काम करायचा. 4 वर्षांपूर्वी दुष्यंतची फरहा नावाच्या मुलीशी ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले आणि नंतर घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले. 'दोघेही बरेच दिवस वेगळे राहत होते. लग्नानंतर सासरचे लोक त्याच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत होते. या दबावामुळे दोघेही वेगळे झाले, असा आरोप तरुणाच्या कुटंबियांनी केला आहे. या दबावामुळे दुष्यंत बराच काळ डिप्रेशनमध्ये होता. मृत्यूपूर्वी दुष्यंतने पत्नी फरहाला फोन केला. दोघांमध्ये 40 मिनिटे बोलणे झाले, यानंतर दुष्यंतने आत्महत्या केली.
घर बंद करून गेले परगावी, इकडे चोरट्यांनी घर फोडले; कुंभारीत साडेतीन लाखांची चोरी
दुष्यंतने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी हिंदू संघटनाही आरोप केले आहेत. मेरठच्या हिंदू संघटनेच्या लोकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासोबतच पत्नीच्या कुटुंबीयांवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
कुटुंबियांनी अजुनही तक्रार दिलेली नाही. धर्मांतरासाठी दबाव आणल्यासारखे आरोप होत असला तरीही अजूनपर्यंत कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार केलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.