सौरभ राजपूतच्या हत्येच्या आरोपाखाली मेरठ जेलमध्ये असलेली मुस्कान रस्तोगी आता आई होणार आहे. तिची प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आली. मुस्कानच्या गरोदरपणाची पुष्टी झाल्यानंतर सौरभच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सौरभचा भाऊ बबलूने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. जर मुस्कानच्या पोटात वाढणारं मूल हे त्याचा भाऊ सौरभचं असेल तर ते त्या मुलाला नक्कीच स्वीकारतील असं बबलूने म्हटलं आहे.
बबलूने दिलेल्या माहितीनुसार, मुलाची डीएनए टेस्ट करावी जेणेकरून सत्य बाहेर येईल की ते मूल सौरभचं आहे की मुस्कानचा बॉयफ्रेंड साहिल शुक्लाचं आहे. मुस्कानच्या पोटात वाढणारं मूल सौरभचं आहे, साहिलचं आहे की दुसऱ्या कोणाचं आहे हे जाणून घेणं आधी खूप महत्त्वाचं आहे.
मुस्कान आणि सौरभ यांना ६ वर्षांची मुलगी असल्याची माहिती आहे. सौरभ आणि मुस्कानचे कुटुंब तिच्यावर आता दावा करत आहेत. सौरभच्या कुटुंबाने मुलीला त्यांच्याकडे सोपवण्याची मागणी केली आहे, तर मुस्कानचे कुटुंब कोणत्याही परिस्थितीत मुलीला सौरभच्या कुटुंबाकडे देण्यास नकार देत आहे.
पती सौरभच्या हत्येच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या मुस्कानची डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केली, ज्यामध्ये तिची प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आली. जेल प्रशासनाने मेरठच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना (सीएमओ) पत्र लिहून महिला डॉक्टर पाठवण्याची विनंती केली होती. गेल्या सोमवारी जिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरांचं पथक जेलमध्ये पोहोचलं आणि मुस्कानची वैद्यकीय तपासणी केली.
"माझे मम्मी-पप्पा कुठे गेलेत?"; मुस्कानच्या चिमुकल्या लेकीचा प्रश्न, आजी देते 'हे' उत्तर
सौरभचे कुटुंबीय त्याच्या मुलीचा ताबा देण्याची मागणी करत आहेत. मुस्कानची आई कविता रस्तोगी म्हणाली की, "मुलगी ६ वर्षांपासून आमच्यासोबत राहत आहे. आम्ही तिच्याशिवाय जगू शकत नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मुलीला दुसऱ्या कोणाच्याही ताब्यात देणार नाही. ती नेहमीच आमच्यासोबत राहिली आहे. मुलगी सौरभच्या कुटुंबासोबत कधी २ तासही राहिली नाही. ती सध्या तिच्या मम्मी-पप्पांची आठवण काढत आहे."