मेरठ - देशामध्ये बलात्कार आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशा घटनानंतर संतापाची लाट उसळत असून दोषींना कठोरतील कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येते. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील 100 वर्षीय महिलेवरील बलात्कार प्रकरणात तीन वर्षांनंतर दोषीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने या प्रकरणात दोषी असलेल्या अंकित पूनिया याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
2017 मध्ये अंकित पूनियाने वयोवृद्ध दिव्यांग महिलेवर बलात्कार केला होता. यानंतर बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू झाला होता. सरकारी वकील निशांत वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पीडित महिलेच्या नातवाने खटला दाखल केला होता. या खटल्याचा निकाल तीन वर्षांनी लागला आहे. दोषी अंकित पूनियाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पीडित महिलेच्या नातवाने न्यायालयात दाखल केला खटला
मेरठमध्ये 100 वर्षीय महिलेवरील बलात्काराच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. सर्वच जण हैराण झाले होते. विदेशी माध्यमांमध्येही या घटनेची चर्चा सुरू होती. सरकारी वकील निशांत यांनी पीडित महिलेच्या नातवाने न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश गुल मोहम्मद मादर यांनी आरोपी अंकितला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
अंकित पूनिया हा सुरक्षा रक्षकाची नोकरी करत होता. गावात महिलांची छेडछाड केल्याच्या अनेक तक्रारी त्याच्याविरोधात होत्या. मात्र या प्रकरणी पोलिसांत कोणीही तक्रार दाखल केली नव्हती. त्यामुळे आरोपी आरोपी महिलांची छेड काढत होता. याआधी अलवरमध्येही एका 70 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.