उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मेरठ जिल्ह्यातील खरखोडा भागातील कांशीराम कॉलनीत एका महिलेने कौटुंबिक तणावामुळे आपला संसार उद्ध्वस्त केला आहे. आईच्या मृत्यूनंतर आता मुलगा एकटा पडला आहे, कारण कोरोनाच्या काळात वडिलांचा मृत्यू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, कांशीराम कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
पतीच्या मृत्यूनंतर महिला तणावात
पतीच्या मृत्यूनंतर ही महिला तणावाखाली असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. स्टेशन प्रभारी निरीक्षक राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजली बंबा चौकी परिसरातील कांशीराम कॉलनीत राहणारी इशरत (48) तिच्या मुलासोबत राहत होती. इशरतचे पती जावेद यांचा कोरोनाच्या काळात मृत्यू झाला.
गुरुवारी सायंकाळी इशरत घरी एकटीच असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी मुलगा घरी परतला तेव्हा आईला फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. यानंतर त्याने शेजाऱ्यांना माहिती दिली. कॉलनीतील लोकांनी दरवाजा तोडून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"