मीरारोड - काशीमीरा महामार्गवरील सगणाई देवी मंदिराच्या परिसरात मॅफेड्रॉन (एमडी) हे अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या फहीम करीम खान ह्याला अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने अटक केली . त्याच्याकडून १९ लाख ६० हजार रुपये किमतीचे व ९८ ग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आला आहे.
आरोपी विरुद्ध काशीमीरा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमर मराठे, सहायक पोलीस निरीक्षक विलास कुटे सह पी. डी . टक्के , एस . ए . आव्हाड , सुनील कुडवे , अजय यादव , यांच्या पथकाने केली .