मुंबई - सध्या #MeToo वादळाने देशात थैमान घातले असताना अॅड. फाल्गुनी ब्रम्हभट्ट यांनी विशाखा गाईडलाईन्सनुसार खाजगी आणि सरकारी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाला वाच्या फोडण्यासाठी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत अॅड. फाल्गुनी यांनी राज्य सरकारला राज्यभरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात तीन महिलांची समिती स्थापन करण्याचे कोर्टाने निर्देश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. कितीही जुनी केस असली तरी पोलिसांनी त्याबाबत गुन्हा दाखल करून त्याचा तपास करावा. तसेच गुन्हा दाखल करण्यापूर्वी स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीने पीडित महिलेने प्रकरण ऐकून घेऊन गरज पडल्यास समुपदेशन करावं आणि त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करावं अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १९९७ साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विशाखा गाईडलाईन्सनुसार खाजगी अथवा सरकारी कामकाजाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारींकरिता एक समिती असणं गरजेचं आहे असे अॅड. फाल्गुनी ब्रम्हभट्ट यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं.
Video : #MeToo प्रकरण हायकोर्टात; अॅड. फाल्गुनी ब्रम्हभट्ट यांनी केली याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 7:47 PM