शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

म्हैसाळच्या नऊ जणांवर काळ्या चहातून विषप्रयोग; पिताना संशयही आला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:06 PM

पोलीस तपासात निष्पन्न : सोलापूरचा मांत्रिक रुग्णालयात; दुसरा कोठडीत

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली-मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबातील नऊ जणांच्या हत्याकांडात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. संशयित मांत्रिक आब्बास महंमदअली बागवान व धीरज चंद्रकांत सुरवशे (दोघे रा. सोलापूर) या दोघांनी १९ जूनच्या रात्री वनमोरे कुटुंबातील नऊ जणांना काळ्या चहामधून विषारी द्रव दिल्याचे वृत्त आहे. त्याला पोलिसांनी दुजोरा दिला. दरम्यान, मांत्रिक बागवान यास छातीत दुखू लागल्याने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर सुरवशे याला ७ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

म्हैसाळ येथे दि. २० जूनला डॉ. माणिक व पोपट यल्लाप्पा वनमोरे या दोघा भावांच्या कुटुंबातील नऊ जणांचा विषारी द्रव्य पिल्याने मृत्यू झाल्याचे दिसून आले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून त्यांनी विष पिल्याचे समोर आले होते. सखोल चौकशी केली असता, या प्रकरणात सोलापुरातील मांत्रिक बागवान व त्याचा साथीदार सुरवशे या दोघांचा सहभाग स्पष्ट झाला. बागवान मांत्रिक आहे. त्याने वनमोरे बंधूंकडून गुप्तधनाचा शोध घेण्यास मदत करण्याच्या बहाण्याने मोठी रक्कम घेतली होती. खजिन्याबाबत दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने वनमोरे यांनी पैशासाठी तगादा लावला. यातूनच बागवान आणि सुरवशेने १९ जून रोजी गुप्तधनाचे कारण सांगत ‘वेळ आलीय’, असा बहाणा करत प्रत्येकाला बोलावून घेत काळा चहा पाजला. त्यात विषप्रयोग करण्यात आल्याचे तपासातून पुढे आले आहे. याला एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

दरम्यान, वनमोरे बंधूंकडे मिळालेल्या चिठ्ठ्यांवरून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात २५ सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत १९ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे.मांत्रिक बागवान यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, त्याच्या छातीत दुखत असल्याने मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सुरवशे यास ७ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी