मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) वेबसाईट हॅक करीत खंडणीची मागणी करण्यात आल्याने खळबळ उडाली. मात्र, या धमकीला दाद न देता एमआयडीसीच्या तंत्रज्ञांनी पूर्ण डाटा मिळवत संपूर्ण संगणक यंत्रणा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.२१ मार्च रोजी पहाटे रॅन्समवेअरचा सायबर हल्ला एमआयडीसीच्या संगणक प्रणालीवर केला. त्यामुळे सर्व संगणकीय व्यवहार ठप्प झाले होते. सर्व संगणकीय यंत्रणा बंद पाडत सायबर हल्लेखोरांनी एक धमकीचा संदेश पाठविला. तुम्हाला आधी विशिष्ट रक्कम भरावी लागेल, तरच तुमची वेबसाईट सुरू केली जाईल, अशी धमकी त्यात होती आणि एक विशिष्ट लिंक देऊन त्यावर संपर्क करण्यास सांगितले होते. ५०० कोटींची खंडणी मागितली होती, असा दावा काही चॅनेल्सनी केला. मात्र, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी अशी कोणतीही रक्कम हल्लेखोरांनी नमूद केलेली नव्हती, असे ‘लोकमत’ला सांगितले. सर्व संगणकीय यंत्रणा पूर्वपदावर !nएमआयडीसीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संगणकीय यंत्रणेत व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नेटवर्कवरून संगणक खंडित केले. nमहामंडळाची एक खिडकी योजना, इआरपी, बीपीएएमएस, संगणकीय भू-वाटप प्रणाली, पाण्याची देयके या यंत्रणांच्या बॅकअप फाईल्स वेगळ्या नेटवर्कवर संग्रहित केल्या असून, त्या सर्व सुरक्षित आहेत.nमहामंडळाची वेबसाईट, एक खिडकी योजना, बीपीएएमएस या ग्राहकाभिमुख सेवा योग्य तपासणी करून चालू करण्यात आल्या आहेत. तसेच ईआरपी ही पाण्याची देयक यंत्रणा, आयएफएमएस या यंत्रणा ३१ मार्चपर्यंत पुन्हा कार्यान्वित होतील. सायबर हल्ला यशस्वीपणे परतविण्यासाठी सायबर सुरक्षा तज्ज्ञांची मदत घेत आहोत. सायबर गुन्हे शाखेला तक्रार दिली आहे.
एमआयडीसीची वेबसाइट हॅक; ५०० कोटी रुपयांची मागितली खंडणी?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 9:34 AM