एक 63 वर्षीय महिला ऑनलाईन फ्रॉडची शिकार झाली आहे. एका लिंकवर क्लिक केलं आणि लगेचच पैसे गमावल्याचा दावा महिलेने केला आहे. तिच्या बँक अकाऊंटमधून तब्बल 32 लाख रुपये गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निस असं या महिलेचं नाव असून ती थायलंडच्या ट्रांग प्रांतात राहते. निस यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी व्यक्तीचा त्यांना फोन आला. त्याने आपण थायलंडच्या महसूल विभागाचा कर्मचारी असल्याचं सांगितलं.
निस यांच्या फोनवर त्याने एक लिंक सेंड केली आणि महसूल विभागाच्या वेबसाईटची ही लिंक आहे असं सांगितलं. तसेच यावर क्लिक करून तुम्ही तुमचा टॅक्स चेक करू शकता असंही सांगितलं. पण जेव्हा निसने या लिंकवर क्लिक केलं तेवढ्यात तिच्या बँक अकाऊंटमधून पैसे उडाले. निसच्या अकाऊंटमध्ये जवळपास 32 लाख होते. पण लिंकवर क्लिक केल्यामुळे फक्त तीन हजार रुपयेच शिल्लक राहिले.
Thaiger च्या रिपोर्टनुसार, निसने दिलेल्या माहितीनुसार, लिंकवर क्लिक करताच फोनची स्क्रिन निळ्या रंगाची झाली. नंतर महसूल विभागाच्या लोगोसह एक मेसेज पॉप अप झाला. त्यात काही इंस्ट्रक्शन देण्यात आले. ते फॉलो केल्यानंतर बँक अकाऊंट रिकामं झालं. यानंतर फोन आपोआप लॉक झाला. त्यामुळे पुढे काहीच करता आलं नाही. मोबाईलवर बँकेचा एक मेसेज आला. तेव्हा खात्यातून 32 लाख काढल्याचा मेसेज आला.
निस यांनी आपली मुलगी निदा आणि सून सिरिवान याच्या माध्यमातून बँकेशी संपर्क केला आणि त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. निजा यांनी त्यांच्या आईला यामुळे खूप मोठा धक्का बसल्याचं सांगितलं आहे. तसेच औषधोपचारासाठी हे पैसे ठेवले होते असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.