करोडपतीची पत्नी १३ वर्षे लहान ड्रायव्हरसोबत पळाली, लोणावळा-खंडाळा फिरली आणि पैसे संपताच घरी परत आली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 02:47 PM2021-11-10T14:47:01+5:302021-11-10T14:47:12+5:30

Crime News: मध्य प्रदेशमधील इंदूर येथील एक ४७ वर्षीय महिला तिच्या प्रियकरासह घरातून ४७ लाख रुपये घेऊन पसार झाली होती. सुमारे महिनाभर प्रियकरासोबत फिरल्यानंतर ही महिला सोमवारी रात्री उशिरा पुन्हा घरी आली. तसेच पोलीस ठाण्यात जात तिने जबाबही नोंदवला आहे.

Millionaire's wife escapes with 13-year-old driver, travels to Lonavla-Khandala and returns home | करोडपतीची पत्नी १३ वर्षे लहान ड्रायव्हरसोबत पळाली, लोणावळा-खंडाळा फिरली आणि पैसे संपताच घरी परत आली

करोडपतीची पत्नी १३ वर्षे लहान ड्रायव्हरसोबत पळाली, लोणावळा-खंडाळा फिरली आणि पैसे संपताच घरी परत आली

googlenewsNext

इंदूर - मध्य प्रदेशमधील इंदूर येथील एक ४७ वर्षीय महिला तिच्या प्रियकरासह घरातून ४७ लाख रुपये घेऊन पसार झाली होती. सुमारे महिनाभर प्रियकरासोबत फिरल्यानंतर ही महिला सोमवारी रात्री उशिरा पुन्हा घरी आली. तसेच पोलीस ठाण्यात जात तिने जबाबही नोंदवला आहे.
या महिलेने तिला तिच्या पतीसोबत राहायचे असल्याचे सांगितले आहे. तसेच तिच्या पतीनेही तिला सोबत ठेवण्याची इच्छा असल्याचे सांगितले. या प्रकरणामध्ये पोलिसांनी पोलिसांनी ३४ लाख रुपये आधीच जप्त केले आहेत. मात्र या महिलेचा प्रियकर असलेला ऑटो ड्रायव्हर अजूनही फरार आहे.  
खजराना पोलीस ठाण्याचे सीएसपी जयंत राठोड यांनी सांगितले की, १३ ऑक्टोबर रोजी खजराना परिसरातील एका प्रॉपर्टी ब्रोकरची पत्नी १३ वर्षे लहान ऑटो ड्रायव्हरसोबत पळून गेली होती. जाताना तीन घरातून ४७ लाख रुपये घेऊन गेली. सदर प्रॉपर्टी ब्रोकर कोट्यधीश असल्याचे सांगितले जात आहे.

आरोपींनी या पैशांमधील ३४ लाख रुपये मित्रांना दिले गेले होते. ऑटोचालकाचा मित्र रितेश ठाकूर आणि फुरकान यांच्याकडून हे पैसे पोलिसांनी आधीच जप्त केले होते. पोलिसांनी महिला आणि ऑटो ड्रायव्हरला ताब्यात घेण्यासाठी अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. मात्र दोघेही पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेर सोमवारी रात्री उशिरा सदर महिला स्वत:च पोलीस ठाण्यात हजर झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री उशिरा ही महिला खजराना पोलीस ठाण्यात पोहोचली जिथे बराच वेळ तिची चौशकी करण्यात आली. महिलेने सांगितले की, ती घरातून बाहेर पडली. त्यानंतर भाड्याने घेतलेल्या स्विफ्ट डिझायर टॅक्सीमधून सदर महिला प्रियकरासोबत पीथमपूर येथे पोहोचले. त्यानंतर जावरा, शिर्डी, लोणावळा, खंडाळा, नाशिक, बडोदा आणि सूरतपर्यंत प्रवास केला. मात्र तोपर्यंत त्यांच्याकडील पैसे संपत आले होते. त्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर सदर महिला परत घरी आली. पोलिसांनी या घटनेच्या काही दिवसांनंतर टॅक्सी ड्रायव्हरकडे केलेल्या चौकशीमध्ये ते पीथमपूरमध्ये गेल्याचे समजले. तेथून बसमधून जावरा येथे पोहोचले. तिथून ते फिरत फिरत परत इंदूर येथे आले.

सदर महिलेपेक्षा तिचा प्रियकर तेरा वर्षांनी लहान आहे. मात्र असे असूनही ती त्याच्या प्रेमात पडली आणि ऑटोवाल्यासोबत पळून गेली. महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा पती तिचा छळ करत असे. त्यामुळे मी घरातून पळाले. मात्र मी आता पतीसोबत राहू इच्छित आहे. दरम्यान, या महिलेचा पतीही तिच्यासोबत राहू इच्छितो. दरम्यान ही महिला सोबत नेलेले दागिने परत घेऊन आली आहे. मात्र तिने नेलेले पैसे खर्च झाले आहेत. 

Web Title: Millionaire's wife escapes with 13-year-old driver, travels to Lonavla-Khandala and returns home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.