दिल्ली: पोलिसच व्यावसायिकांना खोट्या खटल्यात अडकवण्याची धमकी देऊन त्यांचे अपहरण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्यांच्याच दोन हवालदारांना अटक केली असून, तिसऱ्याचा शोध सुरू आहे. कॉन्स्टेबल प्रमोद आणि कॉन्स्टेबल सुमित असे या दोघांचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 26 ऑगस्ट रोजी आरोपी दिल्लीतील करोलबाग परिसरातील एका जीन्स बनवणाऱ्या व्यापाऱ्याकडे ट्रेड मार्क विभागाचा अधिकारी बनून गेले. यावेळी त्यांनी व्यापारी अशोक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना धमकी दिली आणि एका नावाजलेल्या कंपनचा बनावट माल तयार करत असल्याचा खोटा अरोप केला. यानंतर अशोक यांना एका कारमध्ये बसून दिल्लीत विविध ठिकाणी फिरवले आणि त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडनी उकळली.
तर, दुसऱ्या एका प्रकरणात 3 सप्टेंबर रोजी करोलबाग परिसरातील मोबाइल व्यापाऱ्याचे या तिघांनी अपहरण केले. त्यानंतर दुकानाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी खटला दाखल करुन सीसीटीव्ही फुटेज तपासल्या, यात तिन्ही आरोपींची ओळख पटली. सध्या दोन कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले असून, तिसऱ्याचा शोध सरू आहे.